“हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर,” ‘धर्मवीर’मधील राज ठाकरे, आनंद दिघेंच्या भेटीचा सीन व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 02:18 PM2022-05-14T14:18:02+5:302022-05-14T14:24:31+5:30
आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा बहुप्रतिक्षित सिनेमा १३ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा बहुप्रतिक्षित सिनेमा १३ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्य, न्यायप्रणाली प्रेक्षकांसमोर आणण्यात आली आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक यानं साकारली आहे. दरम्यान, या चित्रपटातील आनंद दिघे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याशिवाय राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचा रुग्णालयातील भेटीचाही फोटो व्हायरल होत आहे. मनसे रिपोर्ट या अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये आनंद दिघे हे रुग्णालयात असून राज ठाकरे हे त्यांच्या भेटीसाठी गेल्याचं दिसत आहे. या फोटोला ‘हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची आहे- धर्मवीर’ असं कॅप्शन देण्यात आलं असून ‘धर्मवीर आनंद दिघे आणि राज ठाकरे यायातील हॉस्पिटलमधील शेवटचा संवाद,’ असंही लिहिण्यात आलं आहे.
हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची आहे. ❤ pic.twitter.com/NdG2jx6bDl
— सुरज आंबेलकर🇮🇳 (@SAmbelkar) May 14, 2022
याशिवाय धर्मवीर या चित्रपटातील राज ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यातील संवादाची एक क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या चित्रपटाच्या क्लिपमद्ये आनंद दिघे हे राज ठाकरे यांना आता हिंदुत्वाची जबाबादारी तुमच्या खांद्यावर आहे, असं म्हणताना दिसत आहेत.