बस्स मोहब्बत हैं आपसे! सिद्धार्थ जाधवचा लेकीसोबतचा हा व्हिडीओ एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 16:01 IST2021-09-08T15:58:44+5:302021-09-08T16:01:14+5:30
Siddharth jadhav : अलिकडेच सिद्धार्थने त्याच्या लाडक्या लेकीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होताना दिसत आहे.

बस्स मोहब्बत हैं आपसे! सिद्धार्थ जाधवचा लेकीसोबतचा हा व्हिडीओ एकदा पाहाच
'दे धक्का', 'शिक्षणाच्या आईच्या घो', 'गोलमाल रिटर्न्स' अशा अनेक दर्जेदार चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. कलाविश्वासोबतच सिद्धार्थ सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय आहे. अनेकदा तो त्याच्या कुटुंबीयांसोबतचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. अलिकडेच त्याने त्याच्या लाडक्या लेकीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होताना दिसत आहे.
सिद्धार्थने काही दिवसांपूर्वीच त्याच्या धाकट्या लेकीसोबत इरासोबत एक व्हिडीओ शूट केला होता. यात बापलेकीच्या ही अफलातून जोडी कारमध्ये बसली असून 'बस मोहब्बत हैं आपसे', असं म्हणताना दिसत आहे. विशेष म्हणजे इराचा अभिनय पाहून तिनेदेखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय ठरत असून या बापलेकीच्या जोडीला विशेष पसंती मिळत आहे. यापूर्वीदेखील सिद्धार्थने त्याच्या मुलीसोबत असे अनेक मजेदार व्हिडीओ शेअर केले आहे. त्यामुळेच आता इराचेदेखील फॅनफॉलोअर्स हळूहळू वाढू लागले आहेत. सिद्धार्थला इरा आणि स्वरा या दोन मुली आहेत.