प्रथमेश-मुग्धाच्या नात्याची सुकन्या मोने यांना होती खबर; कमेंट करत म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 15:54 IST2023-06-16T15:53:49+5:302023-06-16T15:54:42+5:30
Sukanya mone: प्रथमेश-मुग्धाने जाहीरपणे त्यांचं नातं उघड केल्यानंतर सुकन्या मोने यांनी पहिली कमेंट केली

प्रथमेश-मुग्धाच्या नात्याची सुकन्या मोने यांना होती खबर; कमेंट करत म्हणाल्या...
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमातून मराठी सिनेसृष्टीला पंचरत्न मिळाले. या पंचरत्नांपैकी सध्या सोशल मीडियावर प्रथमेश लघाटे (Prathamesh Lagahte) आणि मुग्धा वैशंपायन या जोडीची चर्चा रंगली आहे. लहानपणापासून एकत्र असलेल्या या जोडीने नुकतीच त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. आमचं ठरलंय असं म्हणत या दोघांनी एकमेकांसोबतचा एक गोड फोटो शेअर केला. हा फोटो पाहिल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. यामध्येच अभिनेत्री सुकन्या मोने यांनी केलेली कमेंट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
प्रथमेश आणि मुग्धा यांच्या नात्याविषयीची कुणकुण मराठी कलाविश्वातील काही कलाकार मंडळींना लागली होती. त्यामुळे या जोडीने जाहीरपणे त्यांच्या नात्याचा खुलासा केल्यानंतर या कलाकार मंडळींनी त्यांच्या पोस्टवर झाडून कमेंटचा पाऊस पाडला. यामध्येच 'मला कल्पना होती', असं म्हणत सुकन्या मोने यांनी कमेंट केली आहे. सोबतच गुगली करत नाहीये ना? असा प्रश्नही विचारला आहे.
काय म्हणाल्या सुकन्या मोने?
कल्पना होतीच पण नक्की ना! काहीतरी गुगली नाही ना? अशी कमेंट सुकन्या मोने यांनी केली आहे. यावर मुग्धानेही होकार देत बातमी खरी असल्याचं सांगितलं. धन्यवाद मावशी...नाही गं नाही, असं म्हणत मुग्धाने प्रथमेशसोबत असलेल्या नात्यावर शिक्कामोर्तब केला.