नोकरी-व्यवसाय आणि संसार या चक्रात अडकलेले शाळेतील मित्र व्हॉट्सअॅप ग्रूपवर 'गेले ते दिन गेले' टाइप्स गप्पा मारत होते. शाळेतली मस्ती, शिक्षकांची टोपण नावं, त्यांनी केलेल्या शिक्षा यावरून सरकत-सरकत गप्पांची गाडी 'ती'च्यावर येऊन थांबली. ती संधी साधून एका कवीमनाच्या मित्रानं रोमँटिक चारोळी पोस्ट केली. ती अशी...
पुन्हा जावे शाळेत पुन्हा ती दिसावी ....भले लागू दे शिकाया लसावि, मसावि
या ओळी वाचून एक मित्र कावला. त्यानंही आपल्या मनातील भावना कवितेतूनच व्यक्त केल्या, त्या अशा....
बनून रे आता गोसावी जी आहे तीच सोसावी विसरून लसावि, मसावि घरची भांडी मस्त घासावी