नवऱ्यावर सतत संशय घेणारी बायको माहेरी गेली. तिथूनही ती वारंवार नवऱ्याला फोन करायची..
पहिला दिवस-बायको- कुठे आहात.. ?नवरा- घरीच..बायको- अच्छा.. मग मिक्सर सुरू करून मला आवाज ऐकवा..नवरा- बरं.. लगेच करतो... घर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र...बायको- ओके.. बाय..
दुसरा दिवस- बायको- कुठे आहात..?नवरा- घरीच..बायको- अच्छा.. मग मिक्सर सुरू करून आवाज ऐकवा..नवरा- बरं.. घे ऐक आवाज... घर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र...बायको- ओके.. बाय..
पुढचे काही दिवस हाच प्रकार सुरू होता.. त्यानंतर नवऱ्याला सरप्राईज देण्यासाठी बायको घरी आली.. मुलगा एकटाच घरी होता...
बायको- काय रे बाबा कुठे आहेत..?मुलगा- काय माहीत.. गेला आठवडाभर मिक्सर घेऊन फिरताहेत..