पत्नी शॉपिंग करून बऱ्याच तासांनी घरी परतली. तिनं आणलेल्या बॅगांची संख्या पाहून पती वैतागला..
पती- हे काय आहे..? किती शॉपिंग करतेस..?
पत्नी- काय झालं..? फक्त आवश्यक वस्तू घेतल्या आहेत..
पती- हे काय घेतलंय..? तुझी पसंती किती वाईट आहे...
पत्नी- उगाच माझ्या पसंतीला नावं ठेवू नका.. तुम्हाला मीच पसंत केलंय..
पत्नीचं उत्तर ऐकून पतीची बोलती बंद...