नाटकाचा पहिला प्रयोग संपतो...
लेखक प्रेक्षकात जाऊन..
लेखक :- कसं वाटलं नाटक? म्हणजे नाटकात काही बदल वगैरे आवश्यक आहेत का ?
प्रेक्षक :- नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते, त्याऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा.
लेखक :- का ?
प्रेक्षक :- म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.