नवरा रात्री ऑफिसला जायला निघाला.. तितक्यात बायकोनं त्याला थांबवलं..
बायको- तुम्ही नका जाऊ ऑफिसला आज...
नवरा- पण का..? काय झालं..?
बायको- आपल्या परिसरात चोऱ्या होण्याचं प्रमाण वाढलंय..
नवरा- काय सांगतेस..?
बायको- हो मग.. काल तर आपल्या घरात चोरी झाली..
नवरा- काय चोरीला गेलं..?
बायको- टॉवेल..
नवरा- कोणतं टॉवेल..?
बायको- तेच टॉवेल जे आपण शिमल्यातल्या हॉटेलमधून उचलून आणलं होतं...
नवरा- अरे बापरे.. मग मी नाही जात ऑफिसला.. थांबतो घरीच..