बायकोनं नुकताच गाण्याचा क्लास सुरू केला होता.. ती गाणं शिकू लागली होती..
एकदा बायको क्लासवरून घरी आली.. नवरा नुकताच ऑफिसमधून घरी आला होता...
बायको- अहो, ऐका ना...
नवरा- बोल ना...
बायको- संगीतात खूप शक्ती असते.. मेघमल्हार रागामुळे पाऊस पडतो.. आणखी एका रागामुळे तर चक्क पाणी गरम होतं...
नवरा- मग काय..? होऊच शकतं..
तुझं गाणं ऐकून माझं पित्त खवळू शकतं, तर पाणी गरम व्हायला काय आहे..?