हल्ली लॉकडाऊनच्या काळात बरेच जण वेगवेगळी कोडी पाठवत असतात. परवा असाच एक मेसेज आला. उलटसुलट अक्षरांमधून इंग्रजी शब्द ओळखा.
अक्षरं होती T A O L P P
हल्ली बराच वेळ घरकामात जात असल्यानं मला लगेचच शब्द कळला आणि मी स्वयंपाकघरातूनच उत्तर पाठवून दिलं P O L P A T....समोरून खो खो हसणाऱ्या इमोजी आल्या आणि उत्तरही.
ते होतं, L A P T O P... .बोलाsss ‘लॉकडाऊन’च्या नावानं...