डॉक्टर (तणावात असलेल्या रुग्ण महिलेला)- बोला.. काय झालंय तुम्हाला..?महिला- सर, माझ्या डोक्यात खूप उलटसुलट विचार येतात.. विचारचक्र थांबतच नाही..डॉक्टर- म्हणजे नेमकं काय होतंय..?महिला- म्हणजे मी इथे आले.. ओपीडीमध्ये एकही रुग्ण नव्हता. तर मी विचार करू लागले, डॉक्टरांकडे एकही रुग्ण नाही. मग यांना किती उत्पन्न मिळत असेल..? घर कसं चालत असेल..? त्यांनी शिक्षणावर इतका पैसा खर्च केलाय.. आता पुढे काय होईल..? रुग्णालय सुरू करण्यासाठी बराच खर्च झाला असणार.. मग आता कर्ज कसं फेडणार..? शेतकऱ्यांप्रमाणे तुम्हीही आत्महत्या केली तर..? असे विचार माझ्या मनात आले..
महिलेचं हे विचार करून आता डॉक्टर तणावाखाली आहेत..