मेषःहे काय,भाजी आणि फुलपुडी आणायला सांगितलं तर फक्त गुलाबाचा गुच्छ घेऊन आलात. आता काय गुलाबाची भाजी आणि गुलाबाची आमटी करू का?बिचारा कर्केचा नवरा : अगं पण....अगं पण करत राहतो.😆😆🤣
वृषभःअय्या, कित्ती क्यूट गुलाब आहेत!! माझ्यासाठी आणलेत?वृश्चिकेचा नवरा : नाही, भांडीवाल्या शेवंताबाईसाठी आणलेत....त्यांना गुलकंद करायचाय ना?😂😂😁😆
मिथुनः गुलाब मस्त आहेत; पण काय हो, या दिवशी गुलाबच का देतात, चाफा का नाही?"मेषेचा नवरा : त्याचं काय आहे, की ज्याने ही प्रथा सुरू केली,तो तुझ्याइतका हुशार नव्हता ना, म्हणून...."😂😂😁
कर्कःअरे वा, छान ताजी फुलं आहेत पण यात थोडी झेंडुची फुलं आणि बेल तुळस वगैरे असतं तर देवाला वाहायला झाली असती.वृषभेचा नवरा तिला कोपरापासून नमस्कार करून निघून जातो.😆😆😂
सिंहः(दरडावणीच्या सुरात) वाट पाहून पाहून मीच हे गुलाब आणलेत आज व्हॅलेंटाईन डे साठी. परत म्हणू नका, माझं प्रेम नाही तुमच्यावर...कर्केचा नवरा आँ वासून बघत राहतो.🤓😁🤣🤣
कन्याःगुलाब मस्त आहेत पण गुच्छातली कडेची फुलं शिळी दिसतायत आणि सिग्नलला गुलाब विकणाऱ्यांकडून तर घेतले नाहीत ना? ते लोक म्हणे स्मशानभूमीतली थडग्यावरची फुलं आणून विकतात...." 😆🤣😂😂
तूळःबरं झालं बाई , गुलाबाचा मोठा गुच्छ आणलात. आता मला गुलकंद करून बघता येईल.🤣🤣😁😁
वृश्चिकःलक्षात आहे म्हणायचा आजचा दिवस. प्रेमाने फुले आणलीत ती. काल रात्री तर म्हणत होतात की तुझ्यासारख्या कजाग बायकोबरोबर संसार करणं म्हणजे मूर्खपणा आहे.🤣🤣😁
धनुःया एका दिवशी गुलाब द्यायचे आणि वर्षभर बायकोच्या डोक्यावर मिऱ्या वाटायच्या....काय अर्थ आहे ? 😁😂😂
मकरःया एका दिवशी होणाऱ्या प्रेमाच्या वर्षावाने माझं नशीब बदलणार आहे का? आता आणलीच आहेत फुलं तर राहु द्या."😆😆😆
कुंभः(गंभीर चेहऱ्याने ) प्रेम ही सुंदर भावना मनात असावी लागते, अशी फुले-बिले देणं म्हणजे प्रेम नाही." 🤓🤓😂
मीनः अरे, तू खरंच गुलाब आणलेस की. मला वाटलं, झेंडूची फुलं आणशील. ख्याख्याख्याख्या....गंमत केली ,चिडू नकोस."🤣🤣
"पुढच्या वर्षी निवडुंगाचीच फुलं देतो," असं म्हणून वृश्चिकेचा नवरा रागारागाने निघून जातो.
(निखळ मनोरंजन करणं हाच या जोकमागचा उद्देश आहे. गंमत म्हणूनच त्याकडे पाहावं.)
सौजन्यः सोशल मीडिया