विधानसभा अध्यक्षांसह शरद पवार गटातील आमदारांना हायकोर्टाने बजावली नोटीस
By दीप्ती देशमुख | Published: February 21, 2024 11:36 AM2024-02-21T11:36:39+5:302024-02-21T11:38:12+5:30
न्यायालयाने या सर्वांना नोटीस बजावत ११ मार्चपूर्वी याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत
मुंबई - शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र न ठरविण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांसह शरद पवारांच्या सर्व आमदारांना नोटीस बजावली.
न्यायालयाने या सर्वांना नोटीस बजावत ११ मार्चपूर्वी याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. अजित पवार यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला असला तरी शरद पवार गटाच्या १० आमदारांना अपात्र ठरवण्याचा अर्ज फेटाळला. अध्यक्षांच्या या निर्णयाला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतोद अनिल पाटील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
'आम्ही अंतरिम दिलासा देणार नाही. आधी नोटीस बजावू,' असे म्हणत न्या. गिरीश कुलकर्णी व न्या.फिरदोश पुनिवाला यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी १४ मार्च रोजी ठेवली.