राणादाने शेअर केला फॅमिली फोटो; आई-वडिलांच्या साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 19:20 IST2022-04-12T19:20:00+5:302022-04-12T19:20:01+5:30
Hardik joshi: हार्दिकने त्याच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त आई-बाबांसोबतचा फोटो शेअर केला होता.

राणादाने शेअर केला फॅमिली फोटो; आई-वडिलांच्या साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं
'तुझ्यात जीव रंगला' ( tuzyat jeev rangala) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. पहिल्याच मालिकेने हार्दिकला तुफान लोकप्रियता मिळवून दिली. त्यामुळे आजही तो राणादा याच नावाने खासकरुन ओळखला जातो. सध्या राणादा म्हणजेच हार्दिक 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!!' (tuzya mazya sansarala ani kay haav) या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
हार्दिक मालिकेच्या माध्यमातून रोज चाहत्यांच्या भेटीला येत असतो. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तो सतत नेटकऱ्यांसोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतो. यात अलिकडेच त्याने त्याच्या आई-वडिलांसोबत एक छानसा फोटो शेअर केला.
हार्दिकने त्याच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त आई-बाबांसोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याच्या आई-वडिलांकडे पाहिल्यानंतर त्यांच्यातील साधेपणा नेटकऱ्यांना विशेष भावला. मुलगा एक लोकप्रिय अभिनेता असतानाही त्याचे आई-वडील अत्यंत साधे रहात असल्यामुळे नेटकऱ्यांनी जोशी कुटुंबियांचं कौतुक केलं आहे.