महागाई दिवसेंदिवस वाढते आहे, व्याजाचे दर मात्र कमी होत आहेत. दरवर्षी म्हणावी तेवढी आणि आपल्याला पाहिजे तेवढी पगार वाढ होताना दिसत नाही, पण महिन्याचे खर्च वेगाने वाढत आहेत. मग या खर्चाची आणि उत्पन्नाची मिळवणी कशी करायची बरं? असा कुठला पैसे देणारा पण विश्वासू पर्याय आहे का? ज्याच्याकडे आपण ठेवलेले पैसे बुडणार नाहीत, आपल्याला हवे तेव्हा पैसे परत मिळू शकतील असा पर्याय उपलब्ध आहे का ? तुमच्या या कठीण प्रश्नाचं सोप्प उत्तर म्हणजे म्युच्युअल फंड !
काय आहे नेमका हा प्रकार?
म्युच्युअल फंड या दोन शब्दांचे अर्थ समजून घेऊया. म्युच्युअल म्हणजे एकमेकांसाठी किंवा परस्परांशी संबंधित आणि फंड म्हणजे निधी किंवा पैसे. असं समजा की तुम्हाला जसा पैसे मिळवण्याचा विश्वासार्ह पर्याय हवा आहे तसाच तो खूप जणांना हवा आहे मग अशा सगळ्या गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्या लोकांचा पैसा हा एका हेतूने एकत्र केला तर त्याला म्युच्युअल फंड असे स्वरूप मिळते.
एका सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊया असा आहे की 25 जणांना स्टेशनवर बस स्टँड वर उतरल्यानंतर एकाच परिसरातल्या ऑफिसमध्ये जायचं आहे त्या सगळ्यांना साधारण थोड्याफार फरकाने एकाच वेळेला ऑफिसमध्ये पोहोचायचं प्रत्येकाने आपापली टू व्हीलर नेली तर खर्च वाढेल आणि प्रत्येकालाच गाडी चालवायचा चालवायचे कष्ट घ्यावे लागतील याउलट जर एक कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा असेल तर कमी खर्चात सर्वांना त्याचा फायदा होईल नेमकं हेच म्युच्युअल फंड करतात या उदाहरणांमध्ये जेवढं वाटतं तेवढे सोपं नसलं तरी फंडाचा फंडा साधारण हाच आहे !
शेअर बाजाराचे ज्ञान नाही , पण पैसे गुंतवायची इच्छा आहे? शेअर बाजाराचे थोडेसे ज्ञान आहे पण एकरकमी भरपूर पैसे गुंतवता येत नाहीत ? शेअर बाजारातील जोखीम कमी हवी आणि थोडीशी मिळणाऱ्या उत्पन्नात स्थिरता सुद्धा हवी ? या सगळ्या अपेक्षा म्युच्युअल फंड पूर्ण करू शकतो.
गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशाचे एका एक्सपर्टने केलेले व्यवस्थापन म्हणजेच म्युच्युअल फंड.