शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

शेअर बाजार की म्युच्युअल फंड?... कुठे मिळेल हमखास नफा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 12:18 IST

शेअर बाजारात गुंतवणूक करताना नेमकी काय काळजी घ्यायची हे शास्त्रोक्तपणी शिकवणाऱ्या अभ्यासक्रमाची संख्यासुद्धा कमी आहे.

शेअर बाजार किंवा त्यातल्या गुंतवणुकीबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये एक भीतीचे वातावरण असते. बाजारातील शेअर्सचे भाव कसे वर खाली जातात त्यामागे कोणती कारणे असतात याचा थांगपत्ता पटकन लागत नाही. पूर्वीपासून बँक, पोस्ट ऑफिस आणि सोने यासारख्या गुंतवणुकीला भारतीय लोक सरावले आहेत. गेल्या वीस - पंचवीस वर्षात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण हळूहळू वाढते आहे मात्र त्यात फारशी प्रगती दिसत नाही.  शेअर बाजारात गुंतवणूक करताना नेमकी काय काळजी घ्यायची हे शास्त्रोक्तपणी शिकवणाऱ्या अभ्यासक्रमाची संख्यासुद्धा कमी आहे. अशावेळी लोकांना संपत्ती निर्मितीसाठी एक हक्काचा मित्र आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड.

शेअर बाजारात गुंतवणूक करणारे कोणत्यातरी मित्राच्या सांगण्यावरून किंवा ऑफिसमधल्या कुणाच्या सांगण्यावरून, नाहीतर स्वतः वाचन वगैरे करून गुंतवतात. यात चूक काहीच नाही! पण बाजाराचे तंत्र आणि मंत्र उमगणे हे अशक्यच! एवढ्या वेगवेगळ्या घटना घडतात, त्याचा कुठल्या शेअरवर कसा, कधी, किती परिणाम होईल हे सांगता येणे अशक्य आहे. एखादेवेळी गुंतवणूक केलेली असते, शेअरचा भाव अपेक्षेप्रमाणे वरवर जात असतो आणि अचानकच काहीतरी होतं आणि शेअर कोलमडते! पैसे बुडतात आणि त्या माणसाचा शेअर बाजारवरचा विश्वास उडतो.  कधी कधी लोक शेअर बाजारात दुसऱ्याच्या माध्यमातून गुंतवणूक करतात.  कुठल्यातरी नातेवाईकाकडे किंवा मित्राकडे आपले पैसे देतात, पण त्याने नेमके कुठले शेअर आपल्यासाठी घेतले आहेत? हे आपल्याला माहिती असलेच असे नाही. हे फक्त विश्वासावर चालतं! हे कायदेशीरपणे योग्य आहे की नाही हा मुद्दा अजूनच वेगळा, पण दुसऱ्याच्या घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आपले पैसे बुडावे हे किती वाईट.

याउलट म्युच्युअल फंडात विश्‍वासार्हता असते.

म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक नेमकी कुठे केली जाते याची संपूर्ण माहिती ती दर महिन्याच्या महिन्याला फंड हाऊसला त्यांच्या वेबसाइटवर दाखवावी लागते. प्रत्येक फंडाच्या प्रत्येक योजनेत कोणत्या शेअर्समध्ये , डिबेंचर्समध्ये गुंतवणूक झाली आहे याचा तपशीलवार अहवाल प्रत्येक गुंतवणूकदाराला पाहायला मिळतो.

रोजच्या रोज म्युच्युअल फंडाच्या प्रत्येक योजनेची नेट असेच व्हॅल्यु (NAV )संध्याकाळी जाहीर होते.  म्युच्युअल फंडातील फंड मॅनेजर स्वतःच्या मर्जीने पैसे गुंतवू शकत नाही. ते  कोणत्या प्रकारच्या शेअर्समध्ये किंवा सिक्युरिटीमध्ये गुंतवावेत याचे नियम घालून दिलेले असतात. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तीपेक्षा म्युच्युअल फंडातील व्यवहार अधिक विश्वासाचे ठरतात.

 

टॅग्स :Knowledge Centerज्ञानाचं केंद्रbusinessव्यवसायMONEYपैसा