शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

नागपूर जिल्ह्यात चार वर्षात बालकांचे हजारावर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:19 AM

नागपूर जिल्ह्यात गेल्या ४ वर्षात १ हजार २ बालकांचा मृत्यू झाला आहे. ४२३ अर्भकांचे मृत्यू, १५९ बालमृत्यू व ४२० उपजत मृत्यूचा समावेश आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात जन्मापेक्षा मृत्यू जास्त जिल्ह्यातील आरोग्याचे वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात गेल्या ४ वर्षात १ हजार २ बालकांचा मृत्यू झाला आहे. ४२३ अर्भकांचे मृत्यू, १५९ बालमृत्यू व ४२० उपजत मृत्यूचा समावेश आहे. त्याचबरोबर जन्मापेक्षा मृत्यूचा आकडा जास्त असल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे.जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून सांभाळली जाते. जिल्ह्यात ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३१६ उपकेंद्र, ३३ आयुर्वेदिक दवाखाने व २५अ‍ॅलोपॅथी दवाखाने आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामीण नागरिक तथा रुग्णांना आरोग्य सेवा पुरविली जात आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाने नोंदविलेली बालमृत्यूची आकडेवारी धक्कादायक आहे. माता व बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. जिल्ह्यातील जन्मदर, मृत्यूदर याची माहिती अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात मिळविली आहे.मुलींचा जन्मदर कमीच!४ वर्षांत एकूण २२ हजार १७३ मुलामुलींनी जन्म घेतला. २२१७३ पैकी ११६०६ मुले, तर १०५६७ मुलींचा समावेश आहे. मुलांच्या तुलनेत मुली तब्बल १ हजार ३९ ने कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्याचबरोबर जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असल्याचे दिसून येत आहे. ४ वर्षांत एकूण ३१ हजार ८३७ नागरिकांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Deathमृत्यू