नागपूर: महाराजबाग प्राणी संग्रहालयात कानन पेंढारी झूलॉजिकल पार्क, बिलासपूर येथून दहा काळवीट लवकरच येणार आहेत. तसेच एका नर चौसिंगाकरिता जोडीदार/ साथिदार म्हणून एक नर आणि दोन मादी सोबत येणार आहेत. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये नागपूर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण नागपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. पुरामध्ये प्राणी संग्रहालयातील काळविट हे मृत्युमुखी पडले होते.
सदर वन्य प्राणी देवाण-घेवाण प्रस्ताव महाराजबाग प्राणी संग्रहालयाने कानन पेंढारी झूलॉजिकल पार्क, बिलासपुर यांना डिसेंबर 2023 रोजी पाठविला होता. सदर प्रस्तावाला कानन पेंढारी झूलॉजिकल पार्क, बिलासपूर यांनी ताबडतोब डिसेंबर 2023 लाच मान्य केले. नंतर सदर प्रस्ताव हा केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांना डिसेंबर 2023 ला मान्यते करिता पाठवण्यात आला. सदर वन्य प्राणी देवाण घेवाण प्रस्तावाला जानेवारी 2024 ला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी मान्यता दिली.