पाण्यासाठी वन टाइम सेटलमेंट योजना कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्थिक वर्षाचा पूर्ण मालमत्ता कर ३० जूनपूर्वी जमा केल्यास सामान्य कराच्या रकमेत १० टक्के तर ३१ डिसेंबरपूर्वी जमा केल्यास सामान्य कराच्या रक्कमेत ५ टक्के सूट देण्याची घोषणा स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी शुक्रवारी सादर केलेल्या मनपा अर्थसंकल्पात केली आहे. वन टाइम सेटलमेंट योजनेंतर्गत अनधिकृत नळांचे कनेक्शन नियमित करण्याची योजना यावर्षीही कायम ठेवावी.
...
सुपर ३०च्या धर्तीवर सुपर ७५
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त नागपूर शहरामध्ये आनंद कुमार यांच्या सुपर ३० या शैक्षणिक चळवळीच्या धर्तीवर सुपर ७५ सुरू करण्याची संकल्पना आहे. त्याअंतर्गत मनपाच्या शाळांमध्ये चाचणी परीक्षेद्वारे आठव्या वर्गाच्या ७५ विद्यार्थ्यांची निवड करून त्यापैकी २५ विद्यार्थ्यांना जेईई, २५ विद्यार्थ्यांना पीएमटी आणि २५ विद्यार्थ्यांना एनडीएचे शिक्षण दिले जाणार आहे.
स्थायी सभापतींनी मानले सर्वांचे आभार
.....
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठी दोन कोटी
- बाळासाहेब ठाकरे स्मृती शैक्षणिक कला, क्रीडा व सांस्कृतिक केंद्रासाठी पाच कोटी.
- शहरातील ७५ चौकांचे सौंदर्यीकरण
- शहरातील सर्व स्वातंत्र्य सेनानींच्या घरासमोर नामफलक लावणे.
- शहरातील १२ बगीच्यालगत वाहणाऱ्या नाल्यांवर एसटीपी संयंत्र बसविणे.
- गरोबा मैदान येथे वैद्यकीय प्रयोगशाळा व रोगनिदान प्रयोगशाळा निर्माण.
- मनपाद्वारे १००० ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करणार.
- मनपाच्या सर्व दहनघाटांवर एलपीजी किंवा विद्युत शवदाहिनी बसविणे.
- दिव्यांगांसाठी पंडित दीनदयाल अंत्योदय योजनेंतर्गत अस्थी अवयव लावण्यासाठी तरतूद.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्थ कॅम्प, शिबिरांचे आयोजन व आवश्यक सुविधांसाठी राखीव निधी
- मनपाच्या विद्यार्थ्यांसाठी सैनिकपूर्व प्रशिक्षण प्रकल्प
- सोनेगाव व गांधीसागर तलावाचे मजबुतीकरण
- मनपा क्षेत्रातील एम्प्रेस मिल परिसरातील वंदे मातरम् उद्यान निर्मिती.
- दिघोरी येथील बिरसानगर भागात विद्यार्थ्यांकरिता स्केटिंग रिंग व गणिती उद्यान.