शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
4
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
5
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
6
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
7
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
8
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
9
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
10
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
11
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
12
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
13
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
14
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
15
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
16
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
17
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
18
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
19
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
20
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

१० लाख ले-आऊट संकटात!

By admin | Published: May 16, 2017 1:43 AM

हॉलक्रो कन्सल्टिंग इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या नेतृत्वातील तज्ज्ञ मंडळाने तयार केलेल्या नागपूर मेट्रो रिजनच्या विकास आराखड्यातील....

नागपूर मेट्रो रिजनला हॉलक्रोची घाई नडली : कल्याणजी भाई शहा उत्कृष्ट उदाहरणसोपान पांढरीपांडे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हॉलक्रो कन्सल्टिंग इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या नेतृत्वातील तज्ज्ञ मंडळाने तयार केलेल्या नागपूर मेट्रो रिजनच्या विकास आराखड्यातील (डेव्हलपमेंट प्लॅन अर्थात डीपी) चुकांमुळे जिल्ह्यातील ७२१ गावांमधील जवळपास १० लाख ले-आऊट संकटात सापडले आहेत.लोकमतजवळ नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) व हॉलक्रोच्या नेतृत्वातील तज्ञ्ज मंडळ यामध्ये ११ मे २०११ रोजी झालेल्या कराराची प्रत आहे.या कराराप्रमाणे हॉलक्रोला नागपूर मेट्रो रिजनचा २०१० ते २०६० असा ५० वर्षांचा विकास आराखडा तयार करायचा होता. मेट्रो रिजनमधील ७२१ गावांचे आर्थिक सर्वेक्षण करून हॉलक्रोला प्रत्येक गावासाठी विस्तृत आराखडा तयार करायचा होता. यामध्ये गावातील उपलब्ध जमिनीचा वापर कृषी, उद्योग व रहिवासी क्षेत्र यांच्यासाठी रस्ते व इतर नागरी सुविधासहित हॉलक्रोला ११ कोटी ९५ लाख रुपये मिळणार होते.परंतु हॉलक्रोने या अटी पाळल्या नाहीत असे आता उघडकीस येते आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हॉलक्रोच्या तज्ज्ञांनी ७२१ पैकी एकाही गावात सर्वेक्षण न करता वेगवेगळ्या सरकारी विभागांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मेट्रो रिजनचा आराखडा बनवला आहे. त्यामुळे आधी मंजूर झालेल्या अनेक लेआऊटची जमीन उपयोगिता एका रात्रीत बदलली आहे. परिणामी ७२१ गावांमधील जवळ १० लाख ले-आऊट संकटात आले आहेत. दरम्यान यासंबंधी लोकमतने हॉलक्रो व एनआयटी यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्ही संस्थांच्या मुख्यालयातील कुणीही अधिकारी याबाबत बोलण्यासाठी तयार झाला नाही.कल्याणजी भाई शहांची केसहॉलक्रोच्या या चुकीचा नागरिकांना कसा फटका बसला आहे ते कल्याणजी भाई शहा यांच्या उदाहरणातून स्पष्ट होते. कल्याणजी भार्ईंनी २००६ साली कामठी तहसीलमधील तरोडी (बु) गावातील ०.७४ हेक्टर कृषी भूमी खरेदी केली. ही जमीन उद्योगासाठी राखीव असल्याने तिची जमीन उपयोगिता औद्योगिक क्षेत्र म्हणून बदलण्यासाठी कल्याणजी भार्इंनी अर्ज केला. तो डिसेंबर २००९ मध्ये मंजूर होऊन ही जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव झाली.परंतु २०१५ साली नागपूर मेट्रो रिजनचा आराखडा जाहीर झाला व त्यावर जनसुनावणी सुरू झाली. कल्याणजीभार्इंचे प्रकरण १४ आॅगस्ट २०१५ रोजी सुनावणीसाठी आले व त्यात कल्याणजीभार्ईंनी आपली जमीन मेट्रो रिजन येण्यापूर्वीच औद्योगिक क्षेत्र म्हणून राखीव झाली असल्याने जमिनीची उपयोगिता बदलू नये अशी विनंती केली. ती मान्य झाली.परंतु अचानकपणे १७ आॅक्टोबर २०१६ रोजी कल्याणजीभार्इंना एनआयटीकडून पत्र मिळाले व त्यात कल्याणजीभार्इंची जमीन ‘सिवरेज डिस्पोजल प्लॅन्ट’साठी राखीव असल्याने तिची उपयोगिता अंशत: रहिवासी व अंशत: कृषी भूमी असे करण्यात आल्याचे कळविण्यात आले.त्या दिवसापासून ७८ वर्षे वय असलेले कल्याणजीभाई, एनआयटी, जिल्हा कचेरी, रिजनल टाऊन प्लॅनिंग या सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत पण कुणीही त्यांची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही. कंटाळून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिसेंबर २०१६ रोजी पत्र पाठवून न्याय मागितला पण अजूनही उत्तर नाही. कच्छी विसा ओस्वाल समाजातून येणारे कल्याणजीभाई जैन धर्माचे कट्टर अनुयायी आहेत. संध्याकाळी ६ नंतर ते कुठलाच आहार घेत नाहीत व संपूर्ण शहरभर केवळ सायकलनेच फिरतात. पण अशी समस्या असलेले कल्याणजीभाई एकटे नाहीत. असे हजारो कल्याणजीभाई नागपूर जिल्ह्यात ७२१ गावात दिसून येतात. त्या सर्वांनीच जनसुनावणीत त्यांची बाजू मांडली पण न्याय मिळालेला नाही. त्यामुळे ही सर्व मंडळी आता नागपूरकर असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे आस लावून बसली आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किमान कल्याणजीभाई सारख्या प्रकरणांची पुनर्सुनावणी करणार का हे पाहणे रंजक ठरेल.