शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
2
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...
3
“PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय”; सुप्रिया सुळेंचा टोला
4
"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं
5
शिंदेंचा कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेनेत
6
Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?
7
अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका
8
ऐन दिवाळीत पाकिस्तानात 'ग्रीन लॉकडाऊन'!, याचा नेमका अर्थ काय? असा निर्णय का घेतला?
9
दिवाळीला शिंदे-ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, सोबत केली विठुरायाची आरती
10
लग्नानंतर पहिली दिवाळी एकत्र साजरी करण्यापूर्वीच कपलसोबत आक्रित घडलं अन् सारचं संपलं
11
“४४ वर्षे निष्ठेने काम केले, पण तिकीट नाकारले”; काँग्रेस नेते फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात
12
वळसे पाटलांच्या पराभवासाठी काय करायला हवं?; निकमांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा कानमंत्र
13
पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..?
14
प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार
15
कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या
16
“मनसे साथीने भाजपाचा CM होणार”; राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
DC ला आली पहिल्या प्रेमाची आठवण? हेच असू शकतं पंतच्या 'ब्रेकअप' मागचं कारण 
18
'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल
19
...म्हणून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं, दीपक केसरकर यांनी नेमकं कारण सांगितलं
20
गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १० विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2022 9:55 PM

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने १० अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देचार नागपूरहून तर सहा मुंबईहूनअनुयायांसाठी विशेष सुविधा

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने १० अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईपर्यंत ३ विशेष गाड्या धावतील, ६ विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर आणि एक विशेष गाडी अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत राहील. विशेष गाड्यांचा तपशील असा आहे. विशेष गाडी क्रमांक ०१२६२ नागपूरहून ४ डिसेंबरला रात्री ११.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२६४ ही ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

०१२६६ क्रमांकाची विशेष रेल्वे गाडी ५ डिसेंबरला दुपारी ३.५० वाजता नागपूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल. सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्रमांक ०२०४० अजनी येथून ७ डिसेंबर रोजी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

येथे राहणार थांबे

या विशेष रेल्वे गाड्यांचे अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर स्थानकावर थांबे राहतील.

मुंबईहून येणाऱ्या गाड्या

विशेष गाडी क्रमांक ०१२४९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ६ डिसेंबरला सायंकाळी ४.४५ वाजता सुटेल आणि अजनीला दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ६ डिसेंबरला सायंकाळी ६.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता सेवाग्राम येथे पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२५३ दादर येथून ६ डिसेंबरला मध्यरात्री सुटेल आणि ७ डिसेंबरला दुपारी ३.५५ वाजता अजनीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२५५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ७ डिसेंबरला दुपारी १२.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता नागपूरला पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.०५ वाजता नागपूरला पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक१२५९ दादर येथून ७ डिसेंबरच्या मध्यरात्री सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.५५ वाजता अजनीला पोहोचेल.

----

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे