नागपूर : मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील कोटारालिया जवळ सुरू असलेल्या विकास कामांमुळे ब्लॉक केला जाणार आहे. त्यामुळे भूवनेश्वर एक्सप्रेस, हावडा, पुणे संत्रागाछी एक्सप्रेससह १० रेल्वेगाड्या वेगवेगळ्या तारखांना रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याचे संकेत आहेत.कोटारालिया येथे एनटीपीसी नलाईपल्ली खाणीच्या लाईन कनेक्टिव्हिटी संबंधाने त्या मार्गावर नॉन इंटरलॉकिंग वर्क केले जाणार आहे. परिणामी या मार्गाने धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक प्रभावित होणार आहे. नागपूर मार्गे वेगवेगळ्या तारखांना धावणाऱ्या खालील १० रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
२९ जूनला धावणारी ट्रेन नंबर २०८२२ संत्रागाछी पुणे एक्सप्रेस, १ जुलैला धावणारी ट्रेन नंबर २०८२१ पुणे संत्रागाछी एक्सप्रेस, २६ आणि २९ जूनला धावणारी ट्रेन नंबर १२८७९ एलटीटी भूवनेश्वर एक्सप्रेस, २४ आणि २७ जूनला धावणारी ट्रेन नंबर १२८८० भूवनेश्वर एलटीटी एक्सप्रेस, २५ जून ते ३० जूनपर्यंत धावणारी ट्रेन नंबर १२१३० हावडा पुणे एक्सप्रेस, २७ जून ते२ जुलै पर्यंत धावणारी ट्रेन नंबर १२१२९ पुणे हवाडा एक्सप्रेस, २४, २५, २८ आणि २९ जुनला धावणारी ट्रेन नंबर १२१०१ एलटीटी शालीमार एक्सप्रेस, २६, २७, ३० जून आणि १ जुलैला धावणारी १२१०२ शालीमार एक्सप्रेस, २५ आणि २९ जूनला धावणारी १७००७ सिकंदराबाद दरभंगा एक्सप्रेस तसेच २८ जून आणि २ जुलैला धावणारी १७००८ दरभंगा सिकंदराबाद एक्सप्रेस आदी गाड्यांचा रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये समावेश आहे.