शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

१० वर्षांत नागपूर मनपाच्या ५७ शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 11:01 PM

एकिकडे मराठी भाषेचे संवर्धन व्हावे यासाठी इंग्रजी शाळांमध्येदेखील मराठीचे शिक्षण अनिवार्य करण्यात यावे, अशी मागणी समोर येत आहे. मात्र दुसरीकडे मनपाच्या उदासीन धोरणांमुळे मराठी शाळांना कुलूप लागत चालले आहे. मागील १० वर्षांत मनपाच्या ५७ शाळा बंद झाल्या आहेत. यात मराठी शाळांची संख्याच जास्त आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बंद झालेल्या काही शाळांच्या इमारती चक्क खासगी संस्थांना भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत तर काही शाळांचा अडगळीचे सामान भरण्यासाठी वापर सुरू आहे. खासगी संस्थांना देण्यासाठी या शाळा बंद केल्या का असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देबंद शाळांच्या इमारती खासगी संस्थांनाकुठे झोन कार्यालय, तर कुठे अडगळीचे सामान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकिकडे मराठी भाषेचे संवर्धन व्हावे यासाठी इंग्रजी शाळांमध्येदेखील मराठीचे शिक्षण अनिवार्य करण्यात यावे, अशी मागणी समोर येत आहे. मात्र दुसरीकडे मनपाच्या उदासीन धोरणांमुळे मराठी शाळांना कुलूप लागत चालले आहे. मागील १० वर्षांत मनपाच्या ५७ शाळा बंद झाल्या आहेत. यात मराठी शाळांची संख्याच जास्त आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बंद झालेल्या काही शाळांच्या इमारती चक्क खासगी संस्थांना भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत तर काही शाळांचा अडगळीचे सामान भरण्यासाठी वापर सुरू आहे. खासगी संस्थांना देण्यासाठी या शाळा बंद केल्या का असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे विचारणा केली होती. २००९ पासून मनपाच्या किती शाळा बंद झाल्या, या शाळांमध्ये शिक्षकांची स्थिती काय आहे, तसेच बंद झालेल्या शाळांच्या इमारतींचे काय झाले, इत्यादी प्रश्न त्यांनी यात विचारले होते. मनपाच्या शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार २००९ साली मनपाच्या शहरात १८६ शाळा होत्या. त्यानंतर सातत्याने शाळांची संख्या घटत गेली व २०१८ मध्ये ही संख्या १२९ वर पोहोचली. १० वर्षांच्या कालावधीत मनपाच्या शाळांमध्ये ५७ ने घट झाली. या शाळांमध्ये मराठी, उर्दू व हिंदी शाळांचा समावेश आहे. मात्र मराठी शाळांची संख्या सर्वात जास्त आहे.आश्चर्याची बाब म्हणजे बंद पडलेल्या सर्वच शाळांची इमारत मनपाच्या मालकीची आहे. येथे परत शाळा सुरू करण्याचा प्रयत्न झालेला नाही. उलट चार शाळांची इमारत चक्क खासगी संस्थांना भाडेपट्टीवर देण्यात आली आहे. सहा इमारतींमध्ये मनपाचे झोन कार्यालय तसेच जलप्रदाय विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तीन शाळांच्या इमारतीचा रात्रनिवारा म्हणून उपयोग करण्यात येतो आहे. सदर टेकडी मराठी प्राथमिक शाळेत तर तुटलेले फर्निचर ठेवण्यात आले आहे. मस्कासाथ येथील मनपा शाळेच्या जागेवर मनपाने ‘कॉम्प्लेक्स’च बांधले आहे. १८ इमारती या पूर्णत: रिकाम्या आहेत.पाच वर्षांत १९५ शिक्षक घटलेदरम्यान प्राथमिक व माध्यमिक मनपा शाळांमधील शिक्षकांची संख्यादेखील वर्षनिहाय कमी होत आहे. २०१४ मध्ये मनपाच्या शाळांत १ हजार ४०२ शिक्षक होते. २०१८ मध्ये हीच संख्या १ हजार २०७ वर पोहोचली. पाच वर्षांत शिक्षकांची संख्या १९५ ने घट झाली आहे. अतिरिक्त शिक्षक झाल्याने नवीन पदभरती करण्यात आलेली नाही, असा दावा मनपातर्फे करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSchoolशाळा