शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

उपराजधानीत १०० कोटींची वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:49 PM

शीर्षक वाचून आश्चर्यचकित होऊ नका. ही वस्तुस्थिती आहे की शहरात गेल्या वर्षभरापासून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वीज चोरी झाली आहे.

ठळक मुद्दे३७५१ प्रकरण उघडकीसचार्जशीट केवळ २४ वरझोपडपट्टी व दाट वस्तीत अधिक समस्या

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शीर्षक वाचून आश्चर्यचकित होऊ नका. ही वस्तुस्थिती आहे की शहरात गेल्या वर्षभरापासून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वीज चोरी झाली आहे. वीज वितरण कंपनी याविरुद्ध अनेक वर्षांपासून कारवाई करीत आहे. परंतु गेल्या २०११ पासून विचार केला असता वीज चोरीच्या एकूण ३७५१ प्रकरणांपैकी केवळ २४ प्रकरणातच आरोप पत्र दाखल होऊ शकले . त्यामुळे ही केवळ कागदी कारवाई असल्याचे दिसून येते.शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएल कंपनी शहरात वीज पुरवठा करण्यासाठी दरवर्षी १६०० मिलियन युनिट (एमयू) वीज घेते. एक एमयूमध्ये १० लाख युनिट असतात. एसएनडीएलनुसार यापैकी १५ टक्के वीज वाया जाते. ७.५ टक्के तांत्रिक (वितरण प्रणाली) हानी होते. तर उर्वरित ७.५ टके वाणिज्यिक हानी असते. या वाणिज्यिक हानीचे सर्वात मोठे कारण वीज चोरीच आहे. युनिटचा विचार केला तर वर्षभरात यामुळे १२५ एम. यू. वीज वाया जात आहे. सध्या विजेचे एक युनिट (इंधन समायोजन व अन्य शुल्क धरून) जवळपास ८ रुपये इतके आहे. या हिशोबाने वर्षभरात १०० कोटी रुपयाची वीज चोरी होत आहे. दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर एसएनडीएल आपल्या क्षेत्रात वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणकडून वीज घेते. कंपनीनुसार त्याचे वर्षभराचे वीज बिल एक हजार कोटी रुपयांच्या जवळपास असते. वीज पुरवठा केल्यानंतर कंपनी नागरिकांकडून इलेक्ट्रीसिटी ड्युटी बिल घेते. एकूण व्यवसाय १५०० कोटीच्यावर जातो. यात ७.५ टक्के नुकसान जवळपास १०० कोटी रुपये येतो, असा एसएनडीएलचा दावा आहे. एसएनडीएलने शहरात वीज पुरवठा करणाऱ्या ११ केव्ही फिडरचे आॅडिट करून वीज चोरीसाठी कुख्यात असलेले परिसर नोंदवून ठेवले आहे. यात सर्वात वर ताजबाग फीडरचा क्रमांक येतो. या ठिकाणी ८७ टक्के विजेचे नुकसान दर्शविण्यात आलेले आहे.कशी होत आहे वीज चोरीवीज लाईन मीटरपर्यंत येण्यापूर्वीच त्याला वेगळे करून कनेक्शन जोडले जात आहे.मीटरची छेडछाड करून रिमोटद्वारे संचालित करूनवीज मीटरची आयसी खराब करूनविजेच्या लाईनवर आकडे टाकूनमीटरचा डिस्प्ले खराब करूनअनेक भगात तर मीटर जाळण्यात आले आहेट्रान्सफार्मरमधून थेट कनेक्शन घेऊन

टॅग्स :electricityवीजCrimeगुन्हा