लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्यावतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील ज्या १९२ गावात ८० टक्यापेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा गावात १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक स्तरावर शिबिर आयोजित करण्यात येणार असून या शिबिरात लाभार्थ्यांना तात्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. ज्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आलेला आहे, अशा ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरली तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मे २०१८ या दरम्यान संपूर्ण राज्यात ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये राज्यातील ज्या गावात दलितांची संख्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे व गरीब कुटुंबांचे प्रमाणही जास्त आहे, अशा गावात सौभाग्य योजनेतून वीज नसलेल्या सर्व कुटुंबीयांना वीज जोडणी देण्यात येणार आहे.या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी अशा सर्व १९२ गावात मोठ्या संख्येत शिबिर लावण्यात येणार आहे. या शिबिरात लाभार्थ्यांना तात्काळ वीजजोडणी देण्यात येणार आहे.
दलित वस्तीत १०० टक्के विद्युतीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 9:17 PM
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्यावतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील ज्या १९२ गावात ८० टक्यापेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा गावात १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महावितरणचा पुढाकार