शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

१०० टक्के व्हीव्हीपॅटचा वापर : ३८०० ठिकाणी प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:27 PM

निवडणूक आयोगाने ही निवडणूक व्हीव्हीपॅटनुसार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर १०० टक्के करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यासाठी ६१११ व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत, ते पुरेसे आहे. व्हीव्हीपॅटनुसार निवडणुका होत असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे याबाबत जनजागृती करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात तब्बल ३८०० ठिकाणी व्हीव्हीपॅटची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तब्बल पावणेदोन लाख नागरिकांनी प्रत्यक्ष व्हीव्हीपॅटचा वापर करून याची कार्यप्रणाली समजून घेतली. यासोबतच विविध संस्थांमध्येही याचे सादरीकरण करण्यात आले.

ठळक मुद्देपावणेदोन लाख लोकांनी समजून घेतली प्रणाली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक आयोगाने ही निवडणूक व्हीव्हीपॅटनुसार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर १०० टक्के करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यासाठी ६१११ व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत, ते पुरेसे आहे. व्हीव्हीपॅटनुसार निवडणुका होत असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे याबाबत जनजागृती करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात तब्बल ३८०० ठिकाणी व्हीव्हीपॅटची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तब्बल पावणेदोन लाख नागरिकांनी प्रत्यक्ष व्हीव्हीपॅटचा वापर करून याची कार्यप्रणाली समजून घेतली. यासोबतच विविध संस्थांमध्येही याचे सादरीकरण करण्यात आले.व्हीव्हीपॅटने निवडणुका होत असल्याने मतदानाला उशीर होईल, हे निवडणूक आयोगाने आधीच गृहित धरले आहे. त्यामुळे त्यांनी १२०० ते १४०० चे मतदान केंद्र तयार केले आहे. यापेक्षा जास्त मतदार आल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदार केंद्र राहतील. याला आब्जलरी मतदान केंद्र असे म्हटले जाते. नागपूर जिल्ह्यात असे ४७ ऑब्जलरी मतदान केंद्र आहेत. यात शहरात २८ व रामटेकमध्ये १९ आहेत. पत्रपरिषदेदरम्यान जिल्हाधिकारी मुदगल यांनी पत्रकारांसमोरही व्हीव्हीपॅटचे सादरीकरण करून दाखवले.दिव्यांगांची घेणार विशेष काळजीनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात सात हजार दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या खोलीत त्यांना जाता यावे म्हणून रॅम्प तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शौचालय, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात येईल. इतकेच नव्हे तर दिव्यांग मतदाराने मागणी केल्यास त्यांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्थाही प्रशासनातर्फे करण्यात येईल.प्रत्येक विधानसभेत एक महिला विशेष बूथनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभेत एक विशेष महिला बूथ तयार करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे नागपूर लोकसभा क्षेत्रात ६ व रामटेकमध्ये ६ असे एकूण १२ विधानसभा क्षेत्रात १२ महिला विशेष बूथ राहतील. या बूथवर कर्मचाऱ्यांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंतचे सर्व महिला राहतील.उमेदवारांच्या सोशल मीडियावरही वॉच : पेड न्यूजसाठी कमिटी स्थापनसार्वजनिक लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून प्रशासन इलेक्शन मोडवर आले आहे. नागपूर व रामटेक लोकसभा निवडणूक पहिल्याच टप्प्यात होणार आहे. यासोबतच काटोल विधानसभेची पोटनिवडणूकही होणार असून यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या सोशल मीडियावरही प्रशासनाची नजर राहील, हे विशेष.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी पत्रपरिषदेद्वारा निवडणुकीबाबतच्या तयारीची सविस्तर माहिती दिली. उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबतच जे अ‍ॅफिडेव्हीट द्यावे लागते, त्यात यंदा उमेदवारांना ते वापरत असलेले वॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्युटर, फेसबूक, यूट्युुब आदीची माहितीही भरावयाची आहे. यासोबतच पेड न्यूवर लक्ष ठेवण्यासाठी मीडिया मॉनिटरिंग कमिटीच स्थापनाही करण्यात आली आहे. या कमिटीमध्ये मीडियाच्या प्रतिनिधीसह सायबर तज्ज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. यावेळी सोशल मीडियावरील जाहिरातीवरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.पत्रपरिषदेत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त अभिजित बांगर, नासुप्र सभापत शीतल उगले, सीईओ संजय यादव, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा आदी उपस्थित होेते.जाहिरात प्रकाशनासाठी मंजुरी आवश्यकजाहिरातीवर नजर ठेवण्यासाठी मीडिया मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्यात आली आहे. जाहिरात किंवा प्रचार साहित्याचा मजकूर (अ‍ॅडिओ-व्हिडीओ) प्रकाशन करण्यापूर्वी तो मीडिया मॉनिटरिंग कमिटीला दाखविणे बंधनकारक आहे. त्यांचे प्रमाणपत्र घेतल्यानंतरच ते प्रकाशित केले जाईल. पेड न्यूजसंदर्भात काही तक्रार आल्यास २४ तासाच्या आत समितीला त्यावर निर्णय घ्यायचा आहे. समितीकडे तक्रार असल्यास कमिटीची तातडीची बैठक होईल. त्याची खातरजमा केली जाईल. त्यात काही तथ्य आढळल्यास संबंधितांना नोटीस पाठवून खुलासा मागवला जाईल. खुलासा समाधानकारक राहिला तर ठीक अन्यथा पेड न्यूजचा खर्च संबंधिताच्या खात्यात जोडला जाईल.हे आहेत निवडणूक निर्णय अधिकारीनागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल हे नागपूर लोकसभा तर अतिरिक्ति जिल्हाधिकारी श्रीकांत फडके हे रामटेक लोकसभा निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील. यासोबतच प्रत्येक विधानसभेसाठी सहायक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.नागपूर लोकसभा - अश्विन मुदगल (जिल्हाधिकारी)नागपूर दक्षिण-पश्चिम - शिरीष पांडे (उपविभागीय अधिकारी नागपूर शहर)दक्षिण नागपूर - जगदीश कातकर (उपजिल्हाधिकारी-भूसंपादन)पूर्व नागपूर - शीतल देशमुख (उपजिल्हाधिकारी-भूसंपादन)मध्य नागपूर - व्ही.बी. जोशी (उपजिल्हाधिकारी-भूसंपादन)पश्चिम नागपूर - ज्ञानेश भट - उपजिल्हाधिकारी-भूसंपादनउत्तर नागपूर - सुजता गंधे - उपल्हिाधिकारी राजस्वरामटेक लोकसभा- श्रीकांत फडके (अतिरिक्त जिल्हाधिकारी)काटोल - श्रीकांत उंबरकर (उपविभागीय अधिकारी-काटोल)सावनेर - संजय पवार - (उपविभागीय अधिकारी-सावनेर)हिंगणा - सूरज वाघमारे- (उपविभागीय अधिकारी-नागपूर-ग्रामीण)उमरेड - जे.पी. लोंढे -(उपविभागीय अधिकारी-उमरेड)कामठी - व्ही. सवरंगपत्ते (उपविभागीय अधिकारी-मौदा)रामटेक - जोगेंद्र कट्यारे (उपविभागीय अधिकारी-रामटेक)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९VVPATव्हीव्हीपीएटी