लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजने अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या ग्राम स्वराज्य योजनेत नागपूर परिमंडळात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील सहा गावातील १०७ घरे मागील आठवड्यात महावितरणकडून जोडणी देऊन गरीब गावकऱ्यांची घरे प्रकाशमान करण्यात आली.कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांच्या मुख्य उपस्थितीत सावनेर तालुक्यातील रामपुरी येथे योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सावनेर तालुक्यातील रामपुरी येथील उकठराव नागपुरे आणि लक्ष्मण वरखेडे या दोन वीज ग्राहकांना कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या मुख्य उपस्थितीत वीज जोडणी देण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या ग्राम स्वराज्य योजनेत ज्या गावात ८० टक्के पेक्षा जास्त जनता दलित आहे आणि गरीब कुटुंबातील आहे अशा गावातील सर्व घरांचे विद्युतीकरण करण्याची योजना महावितरणकडून आखण्यात आली होती. राज्यात अशा गावांची संख्या १९२ तर नागपूर जिल्ह्यात चार गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला होता. जिल्ह्यातील महावितरणच्या कन्हान उपविभागात येणाºया सिहोरा, भिवापूर उपविभागात येणाºया धुरखेडा आणि सावरगाव उपविभागातील खेडी-गवरगोंडी येथील १२ वीज ग्राहकांना ग्राम स्वराज्य योजनेत वीज जोडणी मागील आठवड्यात देण्यात आली. यात रामपुरी गावात २४, सिहोरा येथे १६, धुरखेडा येथे ५० जोडण्या विशेष मोहीम घेऊन देण्यात आल्या. या शिवाय वर्धा जिल्ह्यातील पुलगाव तालुक्यातील हिवरा येथे ४ तर कवठा येथे १ वीज जोडणी मोहिमेत देण्यात आली.
१०६ गरिबांच्या घरातील अंधार दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:49 AM
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजने अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या ग्राम स्वराज्य योजनेत नागपूर परिमंडळात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील सहा गावातील १०७ घरे मागील आठवड्यात महावितरणकडून जोडणी देऊन गरीब गावकऱ्यांची घरे प्रकाशमान करण्यात आली.
ठळक मुद्देनागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील सहा गावे