लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीजबिलाची थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध महावितरणने कारवाई आणखी तीव्र केली आहे. याअंतर्गत नागपूर झोन व वर्धा जिल्ह्यातील १०,८०० ग्राहकांचे वीजकनेक्शन कापण्यात आले. या ग्राहकांवर एकूण ३३१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. दुसरीकडे महावितरणसंदर्भात नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
जून महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही जिल्ह्यांत थकीत वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. अनेक ग्राहकांनी महावितरणच्या आवाहनानुसार थकबाकी भरली. परंतु, ज्या ग्राहकांनी पैसे भरले नाहीत, त्यांचे वीजकनेेक्शन कापले जात आहे. या मोहिमेंतर्गत बुधवारी महाल डिव्हीजनमधील ३० थकबाकीदार ग्राहकांची वीज कापण्यात आली. त्यांच्यावर एकूण ३४.६२ लाख रुपयांची थकबाकी होती. दोन थकबाकीदारांनी लगेच १.१७ लाखांचा भरणा केल्याने ते कारवाईपासून वाचले. दुसरीकडे ठक्करग्राम, नाईक तलाव, बंगाली पंजा परिसरात पोलीस बंदोबस्तात ८ ग्राहकांचे कनेक्शन कापण्यात आले. ३ ग्राहकांनी तत्काळ पैसे भरले. मोहिमेदरम्यान २४ ठिकाणी वीजचोरीही पकडण्यात आली. या ग्राहकांवर कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजये यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, उपकार्यकारी अभियंता मुकेश चौधरी, प्रशांत भाजीपाले, सहायक अभियंता प्रशांत इंगळे, अल्पेश चव्हाण, तुषार मेंढे यांनी केली.
बॉक्स
पुन्हा हल्ला-शिवीगाळ
वसुली मोहिमेदरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर सातत्याने हल्ले होताहेत. शिवीगाळ केली जात आहे. ताजे प्रकरण बेसा वितरण केंद्रांतर्गत घडले. सहायक अभियंता विनोद नासरे आपल्या सहकाऱ्यांसह अथर्व हेरिटेज येथे थकबाकी वसुलीसाठी गेले. तिथे त्यांनी आतिश पटेल यांच्याकडे गेल्या तीन महिन्यांची थकबाकी असलेले साडेसहा हजार रुपयांच्या बिलांची मागणी केली. थकबाकी न भरल्याने कनेक्शन कापले, असा आरोप आहे की, पथकात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत त्यांना मारण्याची धमकी देण्यात आली. दोन कर्मचाऱ्यांचा मोबाइल हिसकावला. महावितरणच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बॉक्स
महावितरण कार्यालयात गर्दी, कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन
वसुली माेहीम सुरू होताच महावितरण कार्यालयात गर्दी वाढली आहे. कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन होत आहे. अभियंत्यांच्या केबिनमध्ये व बाहेरही लोक गर्दी करीत आहेत. सुरक्षित अंतराच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. बहुतांश नागरिक बिलांसंदर्भात आक्षेप घेत आहेत. अभियंत्यांना बिल व्यवस्थित करून देण्याची विनंती केली जात आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, अनेक महिन्यांपासून दुकान बंद होते. तरीही, बिल आले आहे. तर, सर्वसामान्य नागरिक बिल भरण्यासाठी सवलत देण्याची मागणी करीत आहेत.
व्यापारी कह रहे है कि कई महीनों से दुकान बंद थी फिर भी बिल आया है. आम नागरिक किस्तों की मांग कर रहे हैं.