लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औष्णिक वीज केंद्रात उत्पन्न होणारे कोळशाचे संकट सोडवण्याच्या उद्देशाने वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोलि)ने त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे ११ कोळसा खाणी निश्चित केल्या आहेत. या खाणीमधून निघणाऱ्या कोळशावर पहिला अधिकार औष्णिक वीज केंद्रांचा राहील. त्याच्या वाहतुकीवरही विशेष लक्ष देण्यासाठी वेकोलिने पुढाकार घेतला आहे.वेकोलिकडे एकूण ६३ कोळसा खाणी आहेत. यापैकी ११ खाणी वीज उत्पादनासाठी वेगळ्या करण्यात आल्या आहेत. यापैकी गेल्या पाच वर्षात उघडण्यात आलेल्या ८ ग्रीनफील्ड आणि ३ ब्राऊनफिल्ड खाणीचाही समावेश आहे. या खाणीमधून निघणारा पूर्ण कोळसा वीज उत्पादनसाठी दिला जाईल. वेकोलिने ४५० रुपये प्रति टन या दराप्रमाणे कोळसा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘नॉन पॉवर लिंक्ड’ आणि स्पॉट आॅक्शन ग्राहकाला इतर खाणीमधून कोळसा घ्यावा लागेल.वेकोलिने २०१३-१४ मध्ये वीज केंद्राला ६२ टक्के कोळश्याचा पुरवठा केला होता. तर २०१८-१९ मध्ये त्यांना ८१ टक्के कोळसा दिला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हरियाणा येथील वीज केंद्रांसह वेकोलि एनटीपीसीलाही कोळसा उपलब्ध करीत आहे. महाराष्ट्रातील वीज उत्पादन कंपनी महाजेनको औष्णिक वीज केंद्राला दिल्या जाणाºया एकूण कोळश्यापैकी ५० टक्के उपयोग करीत आहे. मध्य प्रदेश १२ टक्के, एनटीपीसी ७ आणि खासगी वीज कंपन्या वेकोलिच्या १२ टक्के कोळशाचा उपयोग करीत आहेत.२००९-१० मध्ये ४५.७४ मिलियन टन कोळशाचे उत्पादन झाले होते. २०१३-१४ मध्ये ते कमी होऊन ३९.७३ मिलियन टनावर आले होते. जमीन उपलब्ध होऊ न शकणे आणि नुकसानीमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. वेकोलिने सरळ नियम व संभावित नुकसानदायक खाणीला लाभकारक बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला. मागील ५ वर्षात वेकोलिने ८३६४ हेक्टर जमीन प्राप्त करीत ६५४३ कोटी रुपये खुर्चन २० नवीन प्रकल्प सुरु करण्यात यश प्राप्त केले.
११ कोळसा खाणी वीज उत्पादनासाठी निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 11:24 AM
औष्णिक वीज केंद्रात उत्पन्न होणारे कोळशाचे संकट सोडवण्याच्या उद्देशाने वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोलि)ने त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे ११ कोळसा खाणी निश्चित केल्या आहेत.
ठळक मुद्देकोळसा वाहतूकवरही भर एकूण ६३ खाणींचा समावेश