लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरिक फेरबदलांतर्गत बुधवारी शहर पोलिसातील ठाणेदारांसह ११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी रात्री यासंबंधीचे आदेश जारी केले.यामध्ये वाहतूक शाखेचे आर.ए. क्षीरसागर यांना बजाजनगर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. बजाजनगरचे ठाणेदार ज्ञानेश्वर पाटील यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली. हुडकेश्वरचे दुय्यम निरीक्षक किशोर चौधरी यांच्याकडे सक्करदरा ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. सक्करदरा येथील संदीपान पवार यांना कल्याण शाखेत पाठविण्यात आले. गुन्हे शाखेचे के.व्ही.एम. चव्हाण यांना कळमना पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. कळमन्याचे निरीक्षक के.व्ही. तिजारे यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली. कोतवालीचे निरीक्षक उमेश बेसरकर यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली. नियंत्रण कक्षाचे ज्ञानेश्वर भोसले यांच्याकडे कोतवाली ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. गुन्हे शाखेचे संदीप भोसले यांना हुडकेश्वरचे ठाणेदार सत्यवान माने यांच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली. माने यांची मंगळवारी गुन्हे शाखेत बदली करण्यात आली होती. इमामवाड्याचे निरीक्षक रमाकांत दुर्गे यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले. त्यांच्या जागी नंदनवनचे दुय्यम निरीक्षक एम.एम. साळुंखे यांना पाठविण्यात आले. मंगळवारी १५ निरीक्षकांची बदली करण्यात आली होती. दोन दिवसात आंतरिक फेरबदलांतर्गत २६ निरीक्षक प्रभावित झाले. बुधवारी ८५ पीएसआय आणि २८ एपीआयच्याही आंतरिक बदल्या करण्यात आल्या आहेत. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात येत आहेत. येणाऱ्या काही दिवसांत आणखी काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.
नागपुरातील ११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:08 AM
आंतरिक फेरबदलांतर्गत बुधवारी शहर पोलिसातील ठाणेदारांसह ११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी रात्री यासंबंधीचे आदेश जारी केले.
ठळक मुद्देनिवडणूक : शहर पोलिसात फेरबदल