शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

नागपुरात एका दिवसात पहिल्यांदाच ११ हजार टेस्ट; ६९१ नवे रुग्ण, ८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 10:05 AM

Nagpur News कोरोना आणीबाणीच्या काळातही दैनंदिन चाचण्यांची संख्या १० हजारावर गेली नव्हती, परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मंगळवारी तब्बल ११ हजार कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या.

ठळक मुद्दे सर्वच प्रयोगशाळेत पूर्ण क्षमतेने नमुन्यांची तपासणी

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना आणीबाणीच्या काळातही दैनंदिन चाचण्यांची संख्या १० हजारावर गेली नव्हती, परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मंगळवारी तब्बल ११ हजार कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यातून ६९१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या १४४५३४ झाली. ८ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४२९१ वर पोहोचली. दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ६.२८ टक्के आहे.

नागपूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात बाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला होता. सोबतच याच महिन्यात कोरोना चाचण्यांच्या संख्येने पहिल्यांदाच ९ हजाराचा टप्पा ओलांडला होता. तब्बल पाच महिन्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी ९७५२ सर्वाधिक चाचण्या झाल्या. त्यानंतर आज, १०९९६ चाचण्यांची विक्रमी नोंद झाली. विशेष म्हणजे, चार दिवसात चाचण्यांची संख्या ९ हजारांवर गेली. आज सर्वाधिक, ४२७५ चाचण्या खासगी लॅबमध्ये झाल्या. त्यानंतर मेयोच्या प्रयोगशाळेत १०५६, मेडिकलच्या प्रयोगशाळेत १०२१, एम्सच्या प्रयोगशाळेत ५८३, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ३२५, नीरी प्रयोगशाळेत २५१ चाचण्या झाल्या. एकूणच चाचण्यांमध्ये ७५११आरटीपीसीआर, तर ३४८५ रॅपिड अँटिजेनचा समावेश होता. आरटीपीसीआरमध्ये ५५७, तर अँटिजेनमधून ३४ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

- शहरात ५५१, ग्रामीणमध्ये १३८ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या रुग्णांमध्ये शहरातील ५५१, ग्रामीणमधील १३८, तर जिल्ह्याबाहेरील २ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील ५, ग्रामीणमधील १, तर जिल्ह्याबाहेरील २ मृत्यू आहेत. आज ४७७ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १३३७७५ झाली आहे. बरे होण्याचा दर कमी होऊन ९२.५६ टक्क्यांवर आला आहे.

- मेडिकलमध्ये १२७, मेयोमध्ये ९०, एम्समध्ये ५१ रुग्ण

सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ६४६८ झाली आहे. यातील १८२८ रुग्ण रुग्णालयात भरती आहेत. यात मेडिकलमध्ये १२७, मेयोमध्ये ९०, तर एम्समध्ये ५१ रुग्ण आहेत. विविध खासगी कोविड रुग्णालयांसह व कोविड केअर सेंटर मिळून १५६० रुग्ण भरती आहेत. ४६४० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. या सर्व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांचा शोध घेऊन त्यांची चाचणी करण्याच्या कार्याला प्रशासनाने वेग आणला आहे. यामुळे पुढील काही दिवसांत रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- दैनिक चाचण्या : १०९९६

- बाधित रुग्ण : १४४५३४

_- बरे झालेले : १३३७७५

- उपचार घेत असलेले रुग्ण : ६४६८

- मृत्यू : ४२९१

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस