शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

नागपुरातील कोट बनविणाऱ्या कारखान्यात ११.२ लाखाची वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:35 PM

हंसापुरी येथील एका इमारतीत सुरू असलेल्या कोट बनविणाºया कारखान्यात ११.२ लाख रुपयाची वीज चोरी पकडण्यात आली. शहरातील वीज वितरण कंपनी फ्रेन्चाईजी एसएनडीएलने ग्राहकावर वीज चोरीचे ११.२ लाख रुपयाचे एसेसमेंट आणि १.५ लाख रुपयाचे कम्पाऊंडिंग शुल्क ठोठावले आहे.

ठळक मुद्दे३० किलोवॅट लोड थेट खांबावरून चोरले जात होतेहंसापुरीतील ट्रान्सफार्मरवर नजर ठेवल्याने आले उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हंसापुरी येथील एका इमारतीत सुरू असलेल्या कोट बनविणाºया कारखान्यात ११.२ लाख रुपयाची वीजचोरी पकडण्यात आली. शहरातील वीज वितरण कंपनी फ्रेन्चाईजी एसएनडीएलने ग्राहकावर वीज चोरीचे ११.२ लाख रुपयाचे एसेसमेंट आणि १.५ लाख रुपयाचे कम्पाऊंडिंग शुल्क ठोठावले आहे.एसएनडीएलनुसार मोमीनपुरा आणि त्याच्याशी जुळलेल्या परिसरात वीजहानी मोठ्या प्रमणावर वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीची एक चमू परिसरातील ट्रान्सफार्मरचे आॅडिट करीत होती. त्यावेळी कसाबपुरा हंसापुरी येथे विजेचा अत्याधिक वापर होत असून, त्यामानाने वीज बिल मात्र कमी निघत असल्याचे आढळून आले. तेव्हा संबंधित ट्रान्सफार्मरवरून ज्या ग्राहकांना वीज पुरवठा केला जात आहे, त्यांची चौकशी करण्यात आली, तेव्हा एका इमारतीची पाहणी केली असता त्यात कारखाना सुरू होता. येथे १९७२ मध्ये सिंगल फेज कनेक्शन घेण्यात आले होते. हे कनेक्शन याकूब मो. ताहीर याच्या नावावर आहे. तीन माळ्याच्या या इमारतीमध्ये केवळ एकच कनेक्शन असल्याने संशय वाढला. या आधारावर एसएनडीएलच्या दहा सदस्यीय विशेष चमूने पोलिसांना पूर्वसूचना देऊन धाड टाकली. चमूमध्ये एका वरिष्ठ इंजिनियरसह दोन इतर इंजिनियर, दोन महिला कर्मचारी, दोन टेक्निशियन आणि एकासुपरवायझरचा समावेश होता. या चमूने धाड टाकली तेव्हा इमारतीच्या तळमजल्यावरच मीटरने वीज पुरवठा होत होता. उर्वरित माळ्यांसाठी मीटरला बायपास करून थेट खांबावरून वीज पुरवठा घेतला जात होता. एसएनडीएलने विद्युत अधिनियम २००३ चे कलम १३५ आणि १३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सकाळी १०.४० वाजता ही कारवाई सुरू झाली ती दुपारी १.३५ पर्यंच चालली. यादरम्यान सिंगल फेज मीटरसह वीज चोरीचा उपयोग करणाऱ्या सर्व्हिस केबलला जप्त करीत परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.५१ शिलाई मशीन, ३४ प्रेसएसएनडीएलच्या चमूला या ठिकाणी आढळून आले की, मो. कुरैशी मो. तौफीक हे इमारतीच्या वरच्या दोन्ही माळ्यावर गेल्या अनेक वर्षांपासून कोट बनविण्याचा कारखाना चालवीत असल्याचे आढळून आले. या इमारतीमध्ये ५१ शिलाई मशीन आणि ३४ प्रेस आढळून आल्या. हे सर्व विजेवर चालणारे होते. एकूण ३० किलोवॅट कनेक्टेड लोड येथे आढळून आला. कारवाईदरम्यान ४० कामगार काम करीत होते.

टॅग्स :electricityवीजtheftचोरी