आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराष्ट्रातील शेतकरी सरकारी धोरणामुळे नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केला जात आहे. बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी नेस्तनाबूत झाला आहे. शेती तोट्यात असताना शेतमालावर जीएसटी लावण्यात आली आहे. असे असतानाही हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या संदर्भात कुठलीही गंभीरता दाखविली जात नाही. हिवाळी अधिवेशन हे तमाशाचे ठिकाण झाले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीतर्फे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी ११ डिसेंबरला प्रति शेतकरी अधिवेशन डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह, काँग्रेसनगर येथे घेणार आहे. या अधिवेशनात शेतकरी आपला आक्रोश व्यवस्थेपर्यंत पोहचविणार आहे. अधिवेशनात शेतकरी आपल्या समस्या मांडतील. त्या समस्येचा एक ठराव बनविण्यात येईल. हजारो शेतकऱ्यांच्या सहीनिशी ठराव मुख्यमंत्र्यांना दिला जाईल. ठरावाच्या प्रशासकीय मान्यतेला सात दिवसांचा कालावधी दिला जाईल. सात दिवसात सरकारकडून कुठलेही सकारात्मक पाऊल दिसले नाही, तर शेतकरी हिवाळी अधिवेशन बंद पाडतील, असा इशारा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अभिजित फाळके यांनी दिला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या धर्तीवर ११ डिसेंबरला नागपुरात प्रति शेतकरी अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 9:21 PM
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीतर्फे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी ११ डिसेंबरला प्रति शेतकरी अधिवेशन डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह, काँग्रेसनगर येथे घेणार आहे.
ठळक मुद्देभूमिपुत्र संघर्ष वाहिनीतर्फे आयोजन