लोकमत नयूज नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नामुळे नागपूर केमिस्ट असोसिएशनने शहराच्या विविध भागात १२ मेडिकल स्टोअर्स २४ तास सुरू केले आहेत. त्याशिवाय शहरातील अन्य मेडिकल स्टोअर्स सकाळपासून तर सांयकाळ दरम्यान सुरू राहतील.२४ तास उघडी राहणारे मेडिकल स्टोअर्स असे, लोकमत चौकातील जैन मेडिकल स्टोअर्स व प्रिन्स मेडिकोज, गेटवेल फार्मसी धंतोली (गेटवेल हॉस्पिटल), ड्रग्ज स्टोअर्स जीएमसी, हार्दिक मेडिकल मेडिकल चौक, न्यूरॉन फार्मसी धंतोली पोलीस स्टेशनच्या बाजूला, न्यूरॉन फार्मसी न्यूरॉन हॉस्पिटल धंतोली, सीम्स् फार्मसी धंतोली (सीम्स् हॉस्पिटल), किंग्जवे फार्मसी किंग्जवे हॉस्पिटल कस्तुरचंद पार्कच्या बाजूला, न्यू ईरा फार्मसी न्यू ईरा हॉस्पिटल टेलिफोन एक्सचेंज चौक, सेव्हन स्टार फार्मसी सेव्हन स्टार हॉस्पिटल नंदनवन व वोक्हार्ट फार्मसी वोक्हार्ट हॉस्पिटल नॉर्थ अंबाझरी रोड आदींचा यात समावेश आहे.
नागपुरातील १२ औषध दुकाने २४ तास उघडी राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:24 PM