लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील चांपा स्टेशन यार्डाच्या आधुनिकीकरणासाठी आणि चांपा-सारागाव रोड सेक्शनमध्ये तिसरी व चौथी रेल्वे लाईन जोडण्यात येत आहे. विभागात ७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान २७ दिवस आधुनिकीकरण आणि नॉन इंटरलॉकींगचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या १२ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार २६ जानेवारीला २२५१२ कामाख्या-कुर्ला साप्ताहिक एक्स्प्रेस, ३० जानेवारीला २२५११ कुर्ला-कामाख्या साप्ताहिक एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. २६ जानेवारीला १३४२५ मालदा टाऊन-सुरत साप्ताहिक एक्स्प्रेस आणि २८ जानेवारीला १३४२६ सुरत-मालदा टाऊन रद्द राहिल. २७ जानेवारीला १२९५० संत्रागाछी-पोरबंदर आणि २५ जानेवारीला १२९४९ पोरबंदर-संत्रागाछी साप्ताहिक एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. २९ जानेवारीला २२८२९ भुज-शालीमार साप्ताहिक एक्स्प्रेस, २६ जानेवारीला २२८३० शालीमार-भुज साप्ताहिक एक्स्प्रेस रद्द राहिल. २८ जानेवारीला १२७६७ नांदेड-संत्रागाछी साप्ताहिक एक्स्प्रेस आणि ३० जानेवारीला १२७६८ संत्रागाछी-नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. २५ जानेवारीला १२८७० हावडा-मुंबई साप्ताहिक एक्स्प्रेस आणि २७ जानेवारीला १२८६९ मुंबई-हावडा साप्ताहिक एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.नियोजित स्थानकापूर्वी समाप्त होणाऱ्या गाड्या१५ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ५८११७/५८११८ गोंदिया-झारसुगडा-गोंदिया पॅसेंजर गोंदिया-बिलासपूर-गोंदिया दरम्यान धावणार असून ही गाडी बिलासपूर-झारसुगडा-बिलासपूर दरम्यान रद्द राहील. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ५८१११ टाटानगर-इतवारी पॅसेंजर झारसुगडाला समाप्त होऊन ५८११२ या क्रमांकाने टाटानगरला जाईल. त्यामुळे २१ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत ५८११२ इतवारी-टाटानगर पॅसेंजर इतवारी ते झारसुगडा दरम्यान रद्द राहील. २८ आणि २९ जानेवारीला १२४१० निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस बिलासपूरला समाप्त होईल. ही गाडी २९ आणि ३० जानेवारीला बिलासपूर-रायगड दरम्यान रद्द राहील. ३० आणि ३१ जानेवारीला १२४०९ रायगड-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस बिलासपूरवरून सोडण्यात येईल. ही गाडी ३० आणि ३१ जानेवारीला रायगड-बिलासपूर दरम्यान रद्द राहील. २२, २५ आणि २९ जानेवारीला १२२५१ यशवंतपूर-कोरबा एक्स्प्रेस बिलासपूरला समाप्त होईल. २४, २७ आणि ३१ जानेवारीला १२२५२ कोरबा-यशवंतपूर एक्स्प्रेस बिलासपूरवरून रवाना होईल. २४ आणि २८ जानेवारीला २२६४८ त्रिवेंद्रम-कोरबा एक्स्प्रेस बिलासपूरला समाप्त होईल. २६ आणि ३० जानेवारीला २२६४७ कोरबा-त्रिवेंद्रम बिलासपूरवरून सुटेल.
बदललेल्या वेळेनुसार धावणाऱ्या गाड्या२८ आणि २९ जानेवारीला १२१०१ कुर्ला-हावडा ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस ४ तास उशिरा, १२१२९ पुणे-हावडा आझादहिंद एक्स्प्रेस ३.३० तास उशिरा आणि १२८०९ मुंबई-हावडा मेल १.३० तास उशिराने रवाना होईल. ३० जानेवारीला १२२६२ हावडा-मुंबई एक्स्प्रेस ३ तासाने उशिरा सुटेल. तर २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान १२०६९ रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्स्प्रेस ३० मिनिटे उशिरा सुटेल. २२ आणि २९ जानेवारीला २२८८६ पुरी-कुर्ला एक्स्प्रेस आणि २४ व ३१ जानेवारीला २२८६५ कुर्ला-पुरी एक्स्प्रेस बदलेल्या मार्गावरून पुरी-तिलदा-रायपूर-नागपूर या मार्गाने धावणार आहे.