नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानुसार एसटीच्या बसेस ५० टक्के क्षमतेेने चालविण्यात येत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या सहा दिवसात एसटी महामंडळाला प्रवासी नसल्यामुळे ३.६० लाख किलोमीटर रद्द करावे लागले असून एसटीला तब्बल १.२० कोटींचे नुकसान झाले आहे. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात दररोज १.४० लाख किलोमीटर बसेस धावतात. परंतु लॉकडाऊनमुळे बहुतांश प्रवासी प्रवासाचा बेत रद्द करीत आहेत. त्यामुळे १५ ते २० मार्च दरम्यान दररोज ६० हजार किलोमीटर या प्रमाणे ३ लाख ६० हजार किलोमीटर रद्द करण्यात आले आहेत. एसटीच्या नागपूर विभागाचे एका दिवसाचे उत्पन्न ४२ लाख रुपये होते. परंतु प्रवासीच नसल्यामुळे हे उत्पन्न २० ते २२ लाखावर आले असून सहा दिवसात विभागाला १ कोटी २० लाखाचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊन कायम राहिल्यास हे नुकसान आणखी वाढणार आहे.
...........
लॉकडाऊनमुळे उत्पन्नावर परिणाम
`लॉकडाऊनमुळे एसटीच्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. सहा दिवसात ३ लाख ६० हजार किलोमीटर रद्द करावे लागले आहेत. त्यासाठी नागपूर विभागाला १ कोटी २० लाखाचा फटका बसला आहे.`
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
........