लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग हे देशाची अर्थव्यवस्था व रोजगार निर्मितीशी जुळलेले आहेत. या विभागांमध्ये कामाची प्रचंड संधी आहे. या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास व ग्रामीण भागात रोजगार निर्मिती हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. सलग दुसऱ्यांचा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते शनिवारी प्रथमच नागपुरात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुढील योजनांबाबत माहिती दिली.सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खाते माझ्यासाठी तुलनेने नवीन आहे. मात्र देशाच्या विकासात या उद्योगांचा मोठा वाटा आहे. एका अर्थाने हे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणाच आहेत. या उद्योगांवर देशाचा विकासदर अवलंबून आहे. या खात्याचा व्याप खूप मोठा आहे. या उद्योगांच्या उत्पादनांची निर्यात वाढली पाहिजे. मात्र या विभागात काम करीत असताना ग्रामीण भाग व कृषी क्षेत्रात रोजगार निर्मितीला माझे प्राधान्य असेल, असे गडकरी यांनी सांगितले. अद्याप मी निश्चित ‘टार्गेट’ ठरविलेले नाही. मात्र रोजगार निर्मितीचे यावर्षीचे आकडे नक्कीच बदललेले दिसतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.देशभरात राष्ट्रीय महामार्गांची कामे जोरात सुरू आहेत. मुंबई-दिल्ली महामार्गाचे ६० टक्के कामांचे वाटपदेखील झाले आहे. २०२२ पर्यंत हा मार्ग पूर्ण करणार. हा जगातील सर्वात मोठा द्रुतगती मार्ग ठरेल; सोबतच आपल्या देशाची जेवढी लोकसंख्या आहे, तेवढेच म्हणजे १२५ कोटी वृक्ष देशातील महामार्गांच्या कडेला लावण्यात येतील. देशातील महामार्गांच्या बांधकामाचा वेग ३२ किलोमीटर दर दिवस असा आहे. येत्या काळात हा वेग आणखी वाढेल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. मला जी खाती मिळाली, ती चांगलीच आहेत. देशासमोर रोजगार निर्मितीचे मोठे आव्हान आहे. त्यामुळेच पंतप्रधानांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे, असेदेखील ते म्हणाले.पुढील वर्षीपर्यंत गंगा निर्मल होणारगंगा नदीच्या स्वच्छतेचे काम वेगाने सुरू आहे. ती कामे पूर्ण होतीलच. बहुतांश कामांचे वाटप झाले आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत गंगा अविरल व निर्मल होईल. मी त्या खात्याच्या मंत्र्यांना पूर्ण सहकार्य करेल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.राज्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करणारमहाराष्ट्रात सिंचन वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी बळीराजांतर्गत सुरू असलेले १०८ तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत असलेल्या २६ सिंचन योजना पूर्ण करण्यावर भर असेल. मी त्या खात्याचा मंत्री नसलो तरी हे सर्व प्रकल्प पूर्ण होतील, याकडे मी स्वत: लक्ष देईल. हे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील व निधीची कुठलीही कमतरता भासणार नाही, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
महामार्गांच्या कडेला १२५ कोटी झाडे लावणार : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 8:59 PM
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग हे देशाची अर्थव्यवस्था व रोजगार निर्मितीशी जुळलेले आहेत. या विभागांमध्ये कामाची प्रचंड संधी आहे. या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास व ग्रामीण भागात रोजगार निर्मिती हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. सलग दुसऱ्यांचा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते शनिवारी प्रथमच नागपुरात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुढील योजनांबाबत माहिती दिली.
ठळक मुद्देग्रामीण भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य