शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

नागपुरात निवृत्त सिव्हिल सर्जनला १२.७८ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 9:51 PM

१ कोटी, ८० लाखांची लॉटरी लागल्याची बतावणी करून नायजेरियन टोळीने येथील एका सेवानिवृत्त जिल्हा शल्यचिकित्सकाला (सीएस) १२ लाख, ७८ हजारांचा गंडा घातला.

ठळक मुद्दे१.८० कोटींची लॉटरी लागल्याची बतावणी : चार वर्षांपासून बनवाबनवी : नायजेरियन टोळीचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १ कोटी, ८० लाखांची लॉटरी लागल्याची बतावणी करून नायजेरियन टोळीने येथील एका सेवानिवृत्त जिल्हा शल्यचिकित्सकाला (सीएस) १२ लाख, ७८ हजारांचा गंडा घातला. तब्बल साडेतीन वर्षांपासून लॉटरीची रक्कम मिळणार म्हणून आरोपीने सांगितलेल्या खात्यात सीएस रक्कम जमा करीत होते. प्रत्येक वेळी वेगळे कारण सांगून रक्कम हडपणाऱ्या  आरोपींची बनवाबनवी तब्बल चार वर्षांनंतर त्यांच्या ध्यानात आली आणि त्यानंतर त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दशरथ डोमाजी कांबळे (वय ७७) असे या प्रकरणातील तक्रारदार व्यक्तीचे नाव आहे. ते अजनीतील कुकडे लेआऊटमध्ये राहतात.अजनी पोलसांच्या माहितीनुसार, कांबळे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात सेवारत होते. १७ वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. एप्रिल २०१४ मध्ये कांबळे यांच्या मोबाईलवर ९२३४५ १६२४७९० च्या मोबाईलधारक आरोपीचा फोन आला. उपरोक्त मोबाईल नंबरवरून बोलणाºया आरोपीने कांबळेंचे अभिनंदन करून त्यांना १ कोटी ८० लाखांची लॉटरी लागल्याची बतावणी केली. कुठलीही लॉटरी काढली नसतानादेखील एवढ्या मोठ्या रकमेची लॉटरी लागल्याचे ऐकून कांबळेंचा आनंद गगनात मावेनासा झाला. लॉटरीची रक्कम मिळवण्यासाठी मनी ट्रान्सफर चार्ज तसेच वेगवेगळ्या नावाखाली कांबळे यांच्याकडून नमूद मोबाईलधारक आरोपीने रक्कम उकळणे सुरू केले. सर्वात पहिल्यांदा आरोपीने सांगितल्याप्रमाणे कांबळे यांनी १६ एप्रिल २०१४ ला २७ हजार रुपये आरोपीच्या खात्यात जमा केले. त्यानंतर आरोपीच्या साथीदाराने सांगितल्यानुसार कधी ३० तर कधी ५० हजार रुपये कांबळे जमा करू लागले. ही रक्कम भरा, नंतर तुमच्या लॉटरीची रक्कम काढून घ्या, असे म्हणणाºया आरोपीने २० जानेवारी २०१८ ला त्यांना पुन्हा ८० हजार रुपये जमा करायला लावले. कांबळेंने तेदेखील त्यांच्या खात्यात जमा केले. अशा प्रकारे १६ एप्रिल २०१४ ते २० जानेवारी २०१८ या कालावधीत कांबळेंनी आरोपीने सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात १२ लाख, ७८, ३५० रुपये जमा केले. प्रत्येक वेळी त्यांना लॉटरीची रक्कम आता मिळेल, अशी आशा होती. तर, त्यांच्या लालसेचा गैरफायदा घेत आरोपी कांबळेंना रक्कम जमा करायला लावत होते.आप्तांनाही नव्हती खबरबात२० जानेवारीला ८० हजार रुपये जमा केल्यानंतर पुन्हा आरोपींनी त्यांना ८० हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यामुळे कांबळे अस्वस्थ झाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांबळे यांना तीन मुले आहेत. त्यातील एक नागपूर, दुसरा बेंगळुरू आणि तिसरा विदेशात राहतो. चार वर्षात एवढी मोठी रक्कम जमा करणाऱ्या  कांबळेंनी आतापावेतो ही माहिती त्यांच्या कुणाच आप्तस्वकीयांना दिलेली नव्हती. नातेवाईकांना ते सरप्राईस देण्याच्या मन:स्थितीत होते. मात्र, प्रत्येकवेळी आरोपी मोठी रक्कम भरायला सांगत असल्याने त्यांना शंका आली. त्यांनी आपल्या स्वकीयांसोबत चर्चा केली. लॉटरीचे आमिष दाखवून अशा प्रकारे अनेक जणांना गंडविल्याची माहिती अनेकांनी कांबळेंना सांगितली. त्यामुळे त्यांनी अजनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी करून गुरुवारी रात्री आरोपींविरुद्ध फसवणुकीचे कलम ४२०, ३४ तसेच आयटी अ‍ॅक्टचे सहकलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल केला.

 

 

टॅग्स :doctorडॉक्टरCrimeगुन्हा