लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी बेमुदत संप पुकारल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून संपाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी राज्यातील सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नागपुरात तब्बल १२७८ खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी दिली.जिचकार यांनी सांगितले की, मोटार वाहतूक कायद्यानुसार प्रवासी वाहतुकीसाठी परवान्याची आवश्यकता असते. परंतु आपात्कालीन परिस्थितीमध्ये परवान्याच्या परवानगीचे कलम वगळता येते. त्यानुसार २५०, खासगी बसेस, १२६ स्टार बस, ३४० स्कूल बसेस, जीप, टाटा सफारी आदी खासगी वाहनांना व इतरांना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आलेली आहे. असे असले तरी प्रवासी वाहतूक करणाºया कोणत्याही वाहनधारक तसेच चालकांनी एस.टी.च्या भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारु नये व क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करू नये.तसेच स्थानिक स्तरावर शहराबाहेर जाणाºया जनतेच्या सोईसाठी नागपूर शहर येथे जे बसथांबे निश्चित करण्यात आले आहेत त्या थांब्यावरून प्रवासी न्यावेत, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आलेले आहेत.संपकाळात ज्या खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आलेली आहे, त्या वाहनाला अपघात झाल्यास प्रवाशांना विम्याचे संरक्षणही प्रदान करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१२७८ खासगी वाहनांना प्रवासाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 1:27 AM
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी बेमुदत संप पुकारल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून संपाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी .....
ठळक मुद्देगैरसोय टाळण्याचा प्रयत्न : खासगी बसेससह स्कूल बस, जीप, टाटा सफारीलाही प्रवाशांच्या सेवेत विम्याचेही संरक्षण