लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील प्रसिद्ध भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) मध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या कॉमन अॅडमिशन टेस्ट २०१९ (कॅट) मध्ये नागपूरच्या विद्यार्थ्यांनी जबरदस्त प्रदर्शन करीत यश संपादन केले आहे. शनिवारी सायंकाळी कॅटचा निकाल घोषित झाला. मिळालेल्या माहितीनुसार १२७ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहे. यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नागपूरच्या सुशांत सुनील ठोंबरे याने ९९.९९ पर्सेंटाईल प्राप्त केले आहे तर श्रेयस सिंग याने ९९.९८, श्रीराम महालिंगम ९९.९७, शुवेंदू रानाबिजुली याने ९९.५४ पर्सेंटाईल प्राप्त केले आहे. कौस्तुभ चॅटर्जी ९९.४४ व वेदांत व्यास याने ९९.२६ पर्सेंटाईल मिळविले आहे.२४ नोव्हेंबर २०१९ रोजी कॅटची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. यात नागपुरातून २५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. दरवर्षीप्रमामे यंदाही कॅटमध्ये नागपुरातून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्था (व्हीएनआयटी) च्या विद्यार्थ्यांचा प्रभाव राहिला. त्याचबरोबर अन्य कॉलेजच्याही विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. कॅटचे प्रशिक्षण देणारी संस्था ‘टाइम’ चे सहनिदेशक मेहुल झुनझुनवाला व राहुल झुनझुनवाला यांच्या मते यावर्षी निकाल चांगला लागला आहे. इंग्रजीचा पेपर कठीण असल्याने थोडा निकालावर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांना या विषयात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहे. त्याचा रॅँकींगवर परिणाम झाला आहे.सर्वांची पहिली पसंती एबीसीआयआयएममध्ये प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची पहिली प्राथमिकता आयआयएम एबीसी अर्थात आयआयएम अहमदाबाद, आयआयएम बंगळुरु व आयआयएम कोलकाता आहे. यशस्वी झालेल्या उमेदवारांच्या मते या संस्थेमध्ये प्रवेश मिळणे थोडे कठीण असले तरी, रँकींग लक्षात घेता प्रवेश मिळेल अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी आयआयएम नागपूरलाही प्राथमिकता दिली आहे. या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश नाही मिळाला तर आयआयएम नागपूर उत्तम पर्याय आहे. कारण आयआयएम नागपूरची जबाबदारी आयआयएम अहमदाबादवर आहे.सुशांतचे दुसऱ्यांदा प्रयत्न फळालाकॅटमध्ये ९९.९९ पर्सेंटाईल प्राप्त केलेल्या सुशांत ठोंबरे याने गेल्यावर्षी सुद्धा कॅटची परीक्षा दिली होती. परंतु तेव्हा त्याला ९९.२० पर्सेंटाईल मिळाले होते. मात्र त्याला आयआयएम एबीसीमध्ये प्रवेश मिळाला नव्हता. त्याचे स्वप्न आयआयएम एबीसीमधून कुठल्यातरी एका संस्थेत प्रवेश मिळविण्याचे होते. सध्या सुशांत बंगळुरु येथील एका कंपनीत नोकरी करीत आहे. लोकमतशी बोलताना तो म्हणाला की, गेल्यावर्षी अपेक्षित पर्सेंटाईल न मिळाल्याने पुन्हा कॅटची तयारी सुरू केली होती. यावेळी चांगले रँकींग आले आहे. सुशांतला अपेक्षा आहे की, यावेळी त्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.अपेक्षेनुसार आला निकालकॅटमध्ये ९९.९७ पर्सेंटाईल मिळविणारा श्रीराम महालिंगम हा व्हीएनआयटीमध्ये मेकॅनिकल शाखेत अंतिम वर्षाला शिकतो आहे. त्याला मिळालेल्या पर्सेंटाईलबद्दल तो समाधानी आहे. त्याच्यासाठी बी-टेकच्या तयारीबरोबरच कॅटची तयारी करणे कठीण होते. मात्र कॅटमध्ये चांगले रॅँकींग मिळविण्याचा संकल्प केला होता. श्रीराम म्हणाला की लक्ष्य गाठणे थोडे कठीण होते. कॅटच्या तयारीवर विशेष फोकस केला होता.
आयआयएममध्ये प्रवेशासाठी पात्र ठरले नागपूरचे १२७ विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 12:53 AM
देशातील प्रसिद्ध भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) मध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या कॉमन अॅडमिशन टेस्ट २०१९ (कॅट) मध्ये नागपूरच्या विद्यार्थ्यांनी जबरदस्त प्रदर्शन करीत यश संपादन केले आहे.
ठळक मुद्देसुशांत श्रेयस, श्रीराम, शुवेंदू, कौस्तुभ, वेदांत यांना ९९ च्यावर पर्सेटाईल : नागपूरचे प्रदर्शन सुधारले