शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

नागपूर विभागात डेंग्यूचे १२८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 8:34 PM

डेंग्यूसदृश तापाने नागपूर जिल्हा फणफणला आहे. सहा जिल्ह्यांच्या नागपूर विभागात आतापर्यंत १२८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून सर्वाधिक नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. यात महानगरपालिकेच्या हद्दीत ४६ तर नागपूर ग्रामीण भागात १६ असे एकूण ६२ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, १७ आॅगस्ट रोजी खात येथील १७ वर्षीय मुलीचा तर २० आॅगस्ट रोजी वाडी येथील ५७ वर्षीय इसमाचा डेंग्यू संशयित म्हणून मृत्यू झाल्याने डेंग्यूला घेऊन भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात : ६२ रुग्णांची नोंद : वाडीत संशयित रुग्णाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूसदृश तापाने नागपूर जिल्हा फणफणला आहे. सहा जिल्ह्यांच्या नागपूर विभागात आतापर्यंत १२८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून सर्वाधिक नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. यात महानगरपालिकेच्या हद्दीत ४६ तर नागपूर ग्रामीण भागात १६ असे एकूण ६२ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, १७ आॅगस्ट रोजी खात येथील १७ वर्षीय मुलीचा तर २० आॅगस्ट रोजी वाडी येथील ५७ वर्षीय इसमाचा डेंग्यू संशयित म्हणून मृत्यू झाल्याने डेंग्यूला घेऊन भीतीचे वातावरण आहे.एकीकडे सण उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे डेंग्यू गंभीर रूप धारण करीत आहे. डेंग्यू डासांची पैदास पाच एमएल पाण्यातही होत असल्याने जवळजवळ अर्धा जिल्हा तापाने फणफणला आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या डेंग्यू संशयित रुग्णांच्या संख्येत वाढच होत असल्याचे चित्र आहे. डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर परिषद व महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्यावतीने घराघरांची झाडाझडती घेतली जात आहे. परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे विभागाचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे वास्तव आहे. यातच वारंवार तपासणीत एकाच घरात डेंग्यूच्या अळ्या आढळून येत असताना त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार या विभागाला नाही. परिणामी, जनजागृतीच्या भरवशावर हा विभाग डेंग्यूवर मात करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.शहरात ४६ तर ग्रामीणमध्ये १६ रुग्णमहानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाकडे एकट्या आॅगस्ट महिन्यात शहरात २४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, तर जानेवारी ते आतापर्यंत रुग्णांची संख्या ४६वर पोहचली आहे. नागपूर ग्रामीणमध्येही डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत १६ रुग्णांची नोंद झाली आहे.नागपूर ग्रामीणमध्ये दोन संशयिताचा मृत्यूनागपूर ग्रामीणमध्ये खात येथील रहिवासी प्राचिता चंद्रभान आंबिलडुके (१७) या मुलीचा १७ आॅगस्ट रोजी मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दत्तवाडी स्मृतीनगर येथील रहिवासी बालाजी फकिरा भुडे (५७) यांचा मृत्यू २० आॅगस्ट रोजी झाला. भुडे कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. यात सोमवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये केलेल्या तपासणीत डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते.नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या सहा जिल्ह्यातील ९९२ डेंग्यू संशयित रुग्णांची रक्ताची तपासणी केली असता आतापर्यंत १२८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात नागपूर जिल्ह्यात ६२, वर्धेत ३१, चंद्रपुरात ३३, गडचिरोलीत दोन रुग्ण तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.आरोग्य विभागाकडे प्रभावशाली यंत्रणाच नाहीडेंग्यू डासावर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी आरोग्य विभागासोबतच नागरिकांची आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रशासनाकडे डासांशी मुकाबला करण्याची प्रभावशाली यंत्रणा नाही. त्यामुळे अत्यंत संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबतीत शहराला डेंग्यूसारख्या धोक्याच्या मिठीत ढकलले जात आहे.शहरातील गेल्या चार वर्षांतील डेंग्यू स्थितीवर्ष                             रुग्ण२०१४                         ६०१२०१५                         २३०२०१६                        १९५२०१७                        २००रोज सात-आठ रुग्णडेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषध नाही. आजाराच्या लक्षणावरून उपचार केला जातो. सध्या रोज सात-आठ रुग्ण उपचारासाठी येत आहेत. काही रुग्णांना दाखल करून उपचार करावा लागत आहे. डेंग्यूला कारणीभूत असलेला ‘एडीस’ डास हा कूलर, पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुंड्या, डबके व पावसाचे किंवा स्वच्छ पाणी जिथे जमा राहील अशा ठिकाणी लवकर फैलतो. यामुळे प्रत्येकाने पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. मनपाकडूनही डबक्यांवर कीटकनाशक फवारणी करायला हवी.डॉ. पिनाक दंदेडेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभाग आवश्यकडेंग्यूचा डासावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोक सहभागाची आवश्यकता आहे. प्रत्येन नागरिकाने घरात जमा होणाऱ्या पाण्याची, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली तर यावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य आहे.डॉ. प्रशांत जगतापलहान मुलांमध्ये वाढतोय डेंग्यूडेंग्यूचा डास दिवसा चावतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण दिसून येत आहे. शालेय प्रशासनाने याला गंभीरतेने घेत साचलेल्या पाण्यावर फवारणी करणे, विद्यार्थ्यांना फूल बाह्यांचे शर्ट व पँट घालण्याच्या सूचना करणे, वर्गात विशेष उपाययोजना करणे आवश्यक आहे.डॉ. अविनाश गावंडे

टॅग्स :dengueडेंग्यूnagpurनागपूर