शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

१३१७ महिलांची आरोग्य तपासणी

By admin | Published: March 18, 2015 2:41 AM

संसारात अनेक कष्ट उपसत असताना आपल्या आरोग्यकडे ग्रामीण महिला फारसे गांभीर्याने बघत नाहीत.

नागपूर : संसारात अनेक कष्ट उपसत असताना आपल्या आरोग्यकडे ग्रामीण महिला फारसे गांभीर्याने बघत नाहीत. सतत त्रास देणाऱ्या समस्यांकडे, दुखण्यांकडे दुर्लक्ष करीत कामाचा गाडा त्या ओढत असतात. या महिलांचे आरोग्य जपले जावे तसेच त्यांनी आरोग्याचीही काळजी घ्यावी, या हेतूने लोकमत सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नि:शुल्क कॅन्सर रोग तपासणी, रोगनिदान व जनजागृती व्याख्यान शिबिराचे मंगळवारी बुटीबोरी येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल १३१७ महिलांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.लोकमत सखी मंच, कॅन्सर रिलीफ सोसायटी द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रिजनल कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने ‘कॅन्सर होऊ शकतो कॅन्सल’ या शिर्षकाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बुटीबोरी येथील जैन सहेली मंडळाच्या श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट सेंटरमध्ये आयोजित या शिबिराचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल इंडिया कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटचे कर्करोग तज्ज्ञ डॉ. अजय मेहता, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सुचित्रा मेहता, बुटीबोरीच्या सरपंच वंदना ठाकरे उपस्थित होते. मंचावर लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक (परिचालन) अशोक जैन, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग व जैन सहेली मंडळाच्या अध्यक्षा माधुरी बोरा आदी मान्यवर उपस्थित होते.उद्घाटनानंतर डॉ. अजय मेहता यांनी स्तनाच्या कॅन्सरवर तर डॉ. सुचित्रा मेहता यांनी गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर पॉवर प्रेझेंटेशनच्या मदतीने मार्गदर्शन केले. यात कॅन्सर कसा ओळखावा, तो कुणाला होऊ शकतो, आजाराची संभाव्ये लक्षणे, त्याबाबत कोणती काळजी घ्यावी, कोणत्या चाचण्या कराव्या आणि उपचार याबाबत सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व महिलांची सामान्य आरोग्य तपासणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली. यात कॅन्सर संशयित आढळून आलेल्या महिलांची तपासणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रिजनल कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या डॉक्टरांनी केली. कार्यक्रमाला जैन सहेली मंडळाच्या कार्यकारी सदस्या किरण दर्डा, उषा सुराणा, नीना जैन, तारा चोरडिया, प्रमिला मुणोत व डॉ. शैला गांधी उपस्थित होत्या. संचालन लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)५४ महिलांच्या स्तनात आढळल्या गाठी नि:शुल्क कॅन्सर रोग तपासणी, रोगनिदान शिबिरात १३१७ महिलांची तपासणी करण्यात आली. यात ५४ महिलांच्या स्तनात गाठी आढळून आल्या. कॅन्सर संशयित ५६ महिलांचे रक्तनमुने घेण्यात आले. कॅन्सर संशयित ३६ महिलांची पॅपस्मिअर तपासणी करण्यात आली. यातील काही महिलांना उपचारासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रिजनल कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये पाठविण्यात आले.गर्भाशय मुखाचा कर्करोगाचे पूर्वनिदान शक्य-डॉ. सुचित्रा मेहताडॉ. सुचित्रा मेहता म्हणाल्या, कुटुंबाच्या रहाटगाडग्यात भारतीय स्त्रियांचे स्वत:कडे दुर्लक्ष होते. अशावेळी कॅन्सर पाय पसरत जातो. त्याचे निदान होईपर्यंत या आजाराने दुसरी स्टेज ओलांडली असते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या आरोग्याविषयी जागरूक असणे व दुसऱ्यांना जागरूक करणे आवश्यक आहे. गर्भाशय मुखाचा कॅन्सर सहसा हा जननक्षम आणि तरुण-मध्यम वयात येतो. सतत बाळंतपणे, लिंगसंसर्गिक आजार, अस्वच्छता, अनेक पुरु षांशी लैंगिक संबंध या काही बाबी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाशी जास्त निगडित आहेत. याबाबत चांगली बातमी म्हणजे लवकरच निदान झाल्यास याच्यावर उपचार करणे सोपे पडते. नेहमीच्या पॅपस्मिअर आणि ओटीपोटाच्या तपासणी दरम्यान याचे निदान होऊ शकते. या अजारावर आता लसही उपलब्ध आहे. लक्षणेपाळीच्या चक्रात अचानक झालेला बदल, दुर्गंधीयुक्त स्राव जाणे, मासिक पाळी बंद झाल्यानंतर पुन्हा रक्तस्राव सुरू होणे यासारखी लक्षणे गर्भाशयाच्या कर्करोगात दिसतात. याबरोबरच धूम्रपान, एचआयव्हीची लागण, क्लॅमिडिया जंतुदोष, काही हार्मोन्स उदा. गर्भनिरोधक गोळ्यांचा दीर्घकाळ वापर अशी काही इतर कारणेही दिसून येतात. स्त्रियांच्या बाबतीत हा अत्यंत महत्त्वाचा आजार आहे. हा वेगाने वाढतो व लवकर हाताबाहेर जातो. सुरु वातीस गर्भाशयाच्या तोंडाला खडबडीतपणा येतो, नंतर फ्लॉवरच्या आकाराची गाठ होते. त्यानंतर गाठीची झपाट्याने वाढ व प्रसार होतो. कर्करोगाची गाठ व्हायच्या आतच याचे पूर्वनिदान करता येते, असेही त्या म्हणाल्या.यांनी दिली आपली सेवाराष्ट्रसंत तुकडोजी महाराज रिजनल कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे सहसंचालक डॉ.बी.के.शर्मा यांच्या मार्गदर्शनात हॉस्पिटलचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण राठोड, डॉ. विशाखा वालोंद्रे, परिचारिका अनिता तेलंग, मेडिकल सोशल वर्कर विष्णुदास शरणागत व अटेंडन्ट चित्रा उईके यांनी आपली सेवा दिली.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांच्या मार्गदर्शनात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हेमके, वैद्यकीय अधिकारी (बोरखेडी) डॉ. एस.एम. बोरकर, वैद्यकीय अधिकारी (व्याहाड) डॉ. सोनाली बनसोड, वैद्यकीय अधिकारी (बुटीबोरी) डॉ. भावना लिखितकर, वैद्यकीय अधिकारी (सोमनाळा) डॉ. सोनाली दुधाट, वैद्यकीय अधिकारी (सावरगाव) डॉ. प्रीती गेडाम, वैद्यकीय अधिकारी (दहेगावजोशी) डॉ. हर्षा बारापात्रे, वैद्यकीय अधिकारी (बडेगाव) डॉ. अश्विनी डंभारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी पाटील (सावरगाव), वैद्यकीय अधिकारी (टाकळघाट) डॉ. मीना जरुडकर, वैद्यकीय अधिकारी (टाकळघाट) डॉ. सुचित्रा मनुरकर, वैद्यकीय अधिकारी (तिष्टी) डॉ. सोनाली शेट्टेवार, वैद्यकीय अधिकारी (फिरते आरोग्य पथक, नागपूर)डॉ. शिल्पा वानखेडे, वैद्यकीय अधिकारी (फिरते आरोग्य पथक, मिहान) डॉ. रजनी राऊत, वैद्यकीय अधिकारी (फिरते आरोग्य पथक, नरसाळा) डॉ. अर्चना मारीवार, सुनील श्रीगिरीवार, जे.एम.अनकर व शैलेश तभाने यांनी आपली सेवा दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकमत सखी मंचच्या विभाग प्रतिनिधी हेमलता देशमुख व नीलिमा धामंडे यांनी सहकार्य केले. स्तनाच्या कॅन्सरमध्ये लवकर निदान आवश्यक- डॉ. अजय मेहताडॉ. अजय मेहता म्हणाले, ‘कॅन्सर’ हा शब्द भीतीदायक नाही. स्तनांच्या कॅन्सरसंबंधात असे निश्चितपणे म्हणता येईल की, लवकरात लवकर म्हणजेच लक्षणे दिसताच निदान व उपचार झाले तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. यादृष्टीने लोकमत सखी मंचचे हे शिबिर फार महत्त्वाचे कार्य करीत आहे. शिबिरात जनजागृतीसोबतच निदानही केले जात आहे. पाश्चात्त्य देशात शून्य ते पहिल्या स्टेजमध्ये कॅन्सरचे निदान केले जाते, परंतु भारतात ७० ते ८० टक्के रुग्णाच्या कॅन्सरचे निदान तिसऱ्या व चौथ्या स्टेजमध्ये होते. अशा वेळी उपचार करणे कठीण जाते. महिलांनी या आजाराविषयी जागरूक असणे फार महत्त्वाचे आहे. प्रत्येक महिलेने वयाच्या चाळिशीनंतर संपूर्ण आरोग्याची तपासणी करणे आवश्यक आहे. वर्षातून एकदा पॅपस्मिअर, मेमोग्राफी करणे आवश्यक आहे. कुटुंबात कुणाला कॅन्सर असेल त्यांनी वर्षातून दोन-तीन वेळा या तपासण्या कराव्यात.लक्षणेज्या महिलांच्या स्तनात गाठ आहे, स्तनाच्या बोंडातून द्रव येतो, बोंड आत वळलेले असेल, बोंड लाल होऊन वेदना होत असतील, स्तनाचा आकार अचानक वाढलेला असेल, अचानक स्तन आकुंचन पावले असेल, स्तन घट्ट झाले असेल आणि स्नायूंच्या वेदना व पाठदुखी होत असल्यास अशा महिलांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ही स्तनाच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात. स्तनाच्या कॅन्सरच्या निदानासाठी स्तनाची स्वत: तपासणी करणे महत्त्वाचे आहे. आपल्याला स्तनाचा कर्करोग आहे, असा संशय आल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. पथनाट्यातून जनजागृतीया शिबिरात पथनाट्याच्या माध्यमातून महिलांच्या आजारावर जनजागृती करण्यात आली. शिल कला सागर, नागपूरतर्फे हे पथनाट्य सादर करण्यात आले. यात योगेश राऊत, पांडुरंग वानखेडे, तनिश बावणे, सयोनी मिश्रा व अरविंद कुमार आदी कलावंतांचा समावेश होता.