उदय अंधारे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील २७ चार्टर्ड अकाउंटंट्सनी १३,८०० फूट ट्रेकिंग यशस्वीरीत्या पूर्ण केली. यात सहा महिलांचा समावेश होता. आश्चर्याची बाब म्हणजे यात सीएंमध्ये सर्वात वयोवृद्ध महिला ५५ वर्षीय शैलजा विभुते यांचा समावेश होता.
या ट्रेकिंगच्या अनुभवाबाबत या समूहाचे सीए अभिजित केळकर यांच्याशी लोकमतने संवाद साधला असता, त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट्सला अर्थव्यवस्थेच्या निर्माणातील प्रमुख भाग मानले जात असल्याचे सांगितले. सीएंवर अर्थव्यवस्थेसोबतच स्वत:चे आरोग्य उत्तम ठेवण्याची जबाबदारी आहे. या ट्रेकिंग मोहिमेतील पहिला ट्रेक ९१३१ फूट उंचीचा होता. यात सहा तासांत दहा किमीची पायदळ यात्रा होती. ट्रेकिंगचे पुढचे चरण लिड्डरवॉट ते शेकवासपर्यंतचे होते. ही उंची ११,०३९ फुटांची होती. ही ट्रेकिंग पूर्ण केल्यानंतर विविध कोनांतून कोलाकोही शिखराचे दृष्य अद्वितीय असे दिसत होते. ५ किमीच्या अत्यंत कठीण ट्रेकिंगला पाच तास लागले. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही ट्रेकिंग यशस्वी ठरल्याचे अभिजित केळकर यांनी सांगितले.
...........