नागपूर : ब्रेक द चेन अंतर्गत राज्यातंर्गत व आंतरराज्यीय प्रवासासाठी प्रवास करावयाचा असल्यास ई-पास गरजेचा आहे. त्याद्वारेच प्रवास करता येईल. प्रवासासाठी ई पास covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवरून काढता येईल. २२ एप्रिल म्हणजे निर्बंध लागल्यापासून अन्य जिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात बसद्वारे प्रवासी आले नाहीत. शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू आहे. त्यामध्ये राज्य शासन किंवा स्थानिक प्रशासनाच्या मालकीच्या सार्वजनिक बसेसमध्ये क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी प्रवास करू शकतील. मात्र त्यासाठी त्यांना ई-पास लागेल. बसव्दारे प्रवास करणारे प्रवासी ज्या-ज्या ठिकाणी उतरतील, त्या-त्या ठिकाणी सर्व प्रवाशांचे स्टॅम्पिंग करून त्यांना १४ दिवसांसाठी गृहविलगीकरण केले जाईल. थर्मल स्कॅनरचा उपयोग करण्यात येईल आणि लक्षणे आढळल्यास त्यांना कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात पाठविले जाईल अशा सूचना उप प्रादेशिक अधिकारी विनोद जाधव यांनी दिल्या आहेत.
बसने प्रवास करणाऱ्यांचे १४ दिवस गृहविलगीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:08 AM