१६ जूनपासून दहादा दर कमी : ग्राहकांना फायदालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोलचे दर १ जून रोजी ७८ रुपये होते. त्यानंतर १६ जूनला दर १.५० रुपयांची कमी झाले. १६ जूनपासून पेट्रोलचे दर दरदिवशी बदलण्याच्या केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्णयानंतर २९ जूनपर्यंत १४ दिवसांत तब्बल १० दिवस दर कमी झाले. केंद्राच्या निर्णयाचा ग्राहकांना जास्त फायदा झाला असून पंपचालकांना तोटा सहन करावा लागत आहे. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष हरविंदरसिंग भाटिया यांनी सांगितले की, २९ जूनला पेट्रोलचे दर ७४.३६ रुपये आणि डिझेलचे ५९.२५ रुपये दर आहेत. १६ जूनपासून दहा दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. दर कपातीचा ग्राहकांना फायदा झाला, पण पंपचालकांना तोटा सहन करावा लागत आहे. कारण प्रत्येक पंपचालक दरदिवशीच्या विक्रीच्या क्षमतेनुसार पेट्रोल आणि डिझेलची खरेदी करतो. खरेदी केलेला साठा जवळपास तीन दिवस पुरतो. पण खरेदीच्या दिवसापासून दर दररोज कमी झाल्यामुळे प्रत्येक पंपचालकांना तोटा झाला आहे. अर्थात दरदिवशी दर बदलण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका पंपचालकांना बसला आहे. पूर्वी १५ दिवसात एकदाच आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या चढउतारानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ वा कपात व्हायची. त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदी-विक्रीवर काहीही परिणाम होत नव्हता. पण आता दरवाढ कमी आणि दरकपात जास्त होत आहे. अशीच स्थिती राहिली तर कमी विक्रीचे पंप बंद व्हायला वेळ लागणार नाही, असे भाटिया यांनी सांगितले.
१४ दिवसात पेट्रोल ३.६४ रुपयांनी स्वस्त
By admin | Published: June 30, 2017 2:49 AM