लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : पाेलिसांच्या पथकाने मांढळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली. यात जुगार खेळणाऱ्या १४ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून राेख रक्कम, माेटारसायकली, माेबाइल हॅण्डसेट असा एकूण २ लाख ४४ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. ७) करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये टीकाराम मेश्राम (४२), विकास पाेहनकर (३०), उपाली नागदेवे (४९), हेमराज भाेयर (५४), युवराज ठवकर (३०), साैरभ सेलाेकर (१८), विशाल वाघमारे (१८), तेजस लांडगे (१९), सचिन शेंडे (१९), राहुल सेलाेकर (१९), मुकेश वाघमारे (३३), सर्जन चाचेरकर (१८), स्वप्निल जटलवार (२२) व यशवंत सेलाेकर (३२) सर्व रा.मांढळ, ता. कुही यांचा समावेश आहे. मांडळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच, कुही पाेलिसांच्या पथकाने पाहणी केली. तिथे जुगार आढळून येताच त्यांनी धाड टाकली आणि त्यांना अटक केली.
या कारवाईमध्ये त्यांच्याकडून राेख रक्कम, १४ माेबाइल हॅण्डसेट, तीन माेटारसायकली व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण २ लाख ४४ हजार १७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी दिली. या प्रकरणी कुही पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार चंद्रकांत मदने, पाेलीस उपनिरीक्षक अनिल देरकर, शिपाई समाधान पवार, गिरी, राठाेड, अमाेल झाडे, भागवत कुथे यांच्या पथकाने केली.