नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अनुयायांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १४ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील तीन विशेष गाड्या नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, सहा विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई / दादर ते सेवाग्राम /अजनी /नागपूर, दोन विशेष गाड्या कलबुरगि आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान, दोन सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान आणि एक विशेष गाडी अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अशी चालविण्यात येणार आहे.
नागपूर- मुंबई अनारक्षित विशेषस्पेशल ट्रेन ०१२६२ नागपूर येथून ४ डिसेंबरला रात्री २३.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल.
०१२६४ नंबरची स्पेशल ट्रेन५ डिसेंबरला नागपूर येथून सकाळी ८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता पोहोचेल. ०१२६६ ही स्पेशल ट्रेन ५ डिसेंबरला दुपारी ३ वाजता नागपूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५५ वाजता पोहोचेल.
या तीनही गाड्या अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे थांबे घेणार आहेत.
नागपूरकडे परत येण्यासाठीमुंबई / दादर ते सेवाग्राम / अजनी नागपूर या गाड्यांपैकी ०१२४९ क्रमांकाची गाडी ६ डिसेंबरला सायंकाळी ४ .४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि अजनी-नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० ला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१२५१ ही ६ डिसेंबरला सायंकाळी ६.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांंक ०१२५३ ही ७ डिसेंबरला (६ आणि ७ डिसेंबरच्या मध्यरात्री) १२.४० वाजता दादर स्थानकावरून सुटेल आणि अजनी येथे ७ डिसेंबरला दुपारी ३४५ वाजता पोहोचेल.
०१२५५ क्रमांकाची गाडी ७ डिसेंबरला दुपारी १२.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता पोहोचेल.०१२५७ क्रमांकाची गाडी ८ डिसेंबरला सायंकाळी ६.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता पोहोचेल. तर, ०१२५९ ही विशेष गाडी ७ आणि ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२.४० वाजता दादर येथून सुटेल आणि अजनी स्थानकावर त्याच दिवशी दुपारी ३.५५ वाजता पोहोचेल.
या सर्व गाड्या दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी आणि नागपूर रेल्वेस्थानकावर थांबणार आहेत. कलबुरगि - मुंबई अनारक्षित विशेष दोन गाड्या, सोलापूर-मुंबई अनारक्षित विशेष दोन गाड्यांची व्यवस्था आहे.
अजनीहून ७ ला सुपरफास्ट वन-वे स्पेशलअजनी - मुंबई वन-वे सुपरफास्ट अनारक्षित विशेष तसेच अजनी- सीएसएमटी मुंबई ही सुपरफास्ट स्पेशल ट्रेनसुद्धा ७ डिसेंबरला दुपारी १.३० वाजता नागपूरहून निघणार आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता ती मुंबईत दाखल होणार आहे.