शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

नागपुरात १.४० लाखाचा बनावट खाद्यतेलाचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 8:34 PM

अन्न व औषध प्रशासन विभागाने खाद्यतेल विक्रेत्यावर टाकलेल्या धाडीत १.४० लाख रुपये किमतीचा बनावट खाद्यतेलाचा साठा जप्त केला.

ठळक मुद्देअन्न व प्रशासन विभागाची कारवाई : विभागातर्फे तपासणी मोहीम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने खाद्यतेल विक्रेत्यावर टाकलेल्या धाडीत १.४० लाख रुपये किमतीचा बनावट खाद्यतेलाचा साठा जप्त केला.माहितीच्या आधारे विभागाने १५ जुलैला तेलीपुरा, नेहरू पुतळा, इतवारी येथील शंकर ट्रेडिंग कंपनीवर धाड टाकून पेढीचे मालक शंकर विनायक दुरुगकर हे रिफाईन्ड सोयाबीन खाद्यतेलाचा पुनर्वापर केलेल्या १५ किलो व लिटरच्या टिनमध्ये रिपॅकिंग करून टिनला फॉर्च्युन, किंग्ज या नामांकित कंपन्यांच्या कंपनीचे बनावट लेबल व टिकली लावून टिन सीलबंद करून तेलाची विक्री करीत असल्याचे व ग्राहकांची फसवणूक करीत असल्याचे आढळून आले.पेढीकडून रिफाईन्ड सोयाबीन तेल (फॉर्च्युन) १९३.४ लिटर (किंमत १७,१६४ रुपये), किंग्ज ब्रॅण्ड ११५३.४ किलो (किंमत ९५,१५५ रुपये) व खुले तेल ३५८.४ किलो (किंमत २७,३२८ रुपये) असा एकूण १,३९,६४७ रुपये किमतीचा साठा जप्त केला. साठ्यातून प्रत्येकी एक-एक नमुने विश्लेषणासाठी घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व माणके कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) अभय देशपांडे यांच्या नेतृत्वात कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी प्रफुल्ल टोपले आणि विनोद धवड यांनी केली.पुढील सणासुदीच्या दिवसात खाद्यपदार्थांमध्ये भेसळीची जास्त शक्यता असल्याने विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. ग्राहकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास त्याबाबत प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन सहआयुक्त चंद्रकांत पवार यांनी केले आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागraidधाड