शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल

By मोरेश्वर मानापुरे | Published: May 30, 2024 10:08 PM

- घोटाळ्यांची संख्या ३.४६ लाखांवर

नागपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली असलेल्या राष्ट्रीयकृत, खासगी आणि अन्य बँकांमध्ये गत आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १४ हजार ५९६ कोटी रुपयांचे ३,४६,०५९ आर्थिक घोटाळे उघडकीस आल्याचे धक्कादायक वृत्त आहे. हे घोटाळे ६३ नामांकित बँकांमध्ये झाले आहेत. या घोटाळ्यांमध्ये केवळ ७५३.८९ कोटी रुपये वसूल झाले आहेत.

ही माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत उघड झाली आहे. आयटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी उपरोक्त माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेकडे मागितली. त्यांनी मागितलेल्या काही प्रश्नांची उत्तरे रिझर्व्ह बँकेने दिली नाहीत. रिझर्व्ह बँकेने देशातील एकूण ६३ बँकांमध्ये किती कोटींचे घोटाळे झाले, घोटाळ्यांची संख्या आणि वसूल रक्कमेची माहिती बँकवार दिली आहे.

बँकांमध्ये सायबर फसवणूक किती झाली, याची परिपूर्ण माहिती रिझर्व्ह बँकेने दिली नाही. परंतु बँकांनी आर्थिक वर्ष-२०२३ मध्ये कार्ड ऑपरेशन परिसर अथवा इंटरनेट या हेडखाली २,९३,४८७ जणांची २,०६६ कोटींची फसवणूक झाली आणि त्यापैकी केवळ १५१.८५ कोटी रुपये वसूल झाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.बँकांमध्ये दावा न केलेल्या किती कोटींच्या ठेवी आहेत, याची माहिती उत्तरात दिली नाही. परंतु ही माहिती रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.

आर्थिक घोटाळ्यात कर्मचाऱ्यांचाच जास्त समावेशएका प्रश्नाच्या उत्तरात रिझर्व्ह बँकेने शेड्युल व्यावसायिक बँकांमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्यांमध्ये वर्ष-२०२१ मध्ये १४,९०,९३९, वर्ष-२०२२ मध्ये १५,३०,८१० आणि वर्ष-२०२३ मध्ये १६,७९,०५५ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. ३१ मार्च २०२४ पर्यंतची माहिती उपलब्ध नसल्याचे अभय कोलारकर यांना दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.रिझर्व्ह बँकेने बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट, १९४९ आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अ‍ॅक्ट, १९३४ नुसार आर्थिक वर्ष-२०१७ ते एप्रिल-२०२४ पर्यंत विविध एनबीएफसी, सीआयसी, एचएफसी यांच्याकडून आर्थिक दंड वसूल केल्याचे उत्तरात म्हटले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीBanking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक