लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : चाेरट्यांनी वाहन, राेख रक्कम, साेन्या-चांदीचे दागिन्यांसाेबत शेतकऱ्यांची जनावरे, शेतीपयाेगी साहित्य आणि शेतातील शेतमालही चाेरून न्यायला सुरुवात केली आहे. शेतात मळणी करून ठेवलेला हरभरा चाेरट्याने चाेरून नेल्याची घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघाेरी (काळे) शिवारात शुक्रवारी (दि. २६) मध्यरात्री घडली असून, शनिवारी (दि. २७) सकाळी उघडकीस आली. शेतमाल चाेरून नेला जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
चंद्रभान रामदास डाेंगरे (४२, रा. दिघाेरी काळे, ता. कामठी) यांची दिघाेरी (काळे) शिवारात शेती आहे. त्यांनी चालू रबी हंगामात हरभऱ्याची पेरणी केली हाेती. त्या हरभऱ्याच्या पिकाची कापणी केल्यानंतर त्यांनी शुक्रवारी दुपारी मळणी केली. त्यांना ६१ कट्टे (छाेटे पाेते) हरभऱ्याचे उत्पादन झाले हाेते. रात्री उशीर झाल्याने त्यांनी हरभऱ्याचे कट्टे शेतातच ठेवले आणि घरी निघून आले.
दरम्यान, मध्यरात्री शेतात कुणीही नसल्याचे पाहून अज्ञात चाेरट्याने हरभऱ्याचे संपूर्ण कट्टे वाहनात टाकून चाेरून नेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी (शनिवार, दि. २७) ते शेतात गेले असता त्यांचे हरभऱ्याचे कट्टे चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लगेच पाेलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. या हरभऱ्याची एकूण किंमत १ लाख ४९ हजार रुपये असल्याची माहिती त्यांनी पाेलिसांना दिली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक माेहाेड करीत आहेत.